विश्‍वासराव रामचंद्र पुरंदरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वासराव रामचंद्र ऊर्फ श्यामराव पुरंदरे (१९४७ - मे, २०१७) हे पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाच्या प्रशालेत चित्रकला शिक्षक होते. ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुतणे आणि लेखिका चित्रलेखा पुरंदरे यांचे पती होत.

विश्‍वासराव पुरंदरे हे उत्तम चित्रकार होते. नूमवि प्रशालेतील विद्यार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या कमजोर, व्यावहारिक शिक्षण नसलेल्या, परंतु चित्रकला किंवा मूर्तिकलेत रुची असलेल्या युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच आर्थिक मदतही केली. महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला होता.

मराठी भाषेतील अनेक प्रसिद्ध पुस्तकांची मुखपृष्ठ चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.

यांनी पुण्यातल्या पर्वती गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. पेशव्यांनी पुरंदरे घराण्याला दिलेल्या सनदीनुसार ते पर्वतीवरील विष्णू मंदिरातील पूजा करत असत. हे काम त्यांनी सुमारे ५१ वर्षे केले. या मंदिरात त्यांनी अनेक भित्तिचित्रे काढली आहेत.