राजेंद्र बनहट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (१४ जानेवारी, १९३८:नागपूर, महाराष्ट्र) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. लेखक श्री.ना. बनहट्टी हे त्यांचे वडील होय. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. पुण्यात त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे.

बनहट्टी यांचा जन्म नागपूरला झाला, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या बालपणीचे नागपूरचे घर, त्या घरातील सर्वांसोबतच्या आठवणी, काही प्रसंग या सर्वांचे चित्रण बनहट्टी यांनी ‘गोष्टी घराकडील’ या पुस्तकात केले आहे. राजेंद्र बनहट्टी यांच्या गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार मिळाले आहेत.

काही पुस्तके[संपादन]

  • अकबर ते औरंगजेब (१९२३) (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - विल्यम हॅरिसन मूरलॅंड - १८६८ - १९३८).
  • अखेरचे आत्मचरित्र (कादंबरी, १९८२)
  • अपूर्णा (कादंबरी, १९६५)
  • अवेळ (कथासंग्रह, १९८५)
  • आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८)
  • कृष्णजन्म (तीन दीर्घकथा, १९८८)
  • खेळ (कथासंग्रह, १९७५)
  • गंगार्पण (कथासंग्रह, १९८४)
  • गोष्टी घराकडील (बालसाहित्य)
  • जीवन त्यांना कळले हो (नाटक)
  • तिघी - तीन दीर्घ कथा
  • त्रैराशिक
  • नवलाई (प्रवासवर्णन, १९९५)
  • मध्यंतर (कथासंग्रह, १९९४)
  • मरणानंतरचे मरण (कादंबरी, १९८५)
  • माणूस म्हणतो माझे घर (नाटक)
  • युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२)
  • राजेंद्र बनहट्टी यांच्या निवडक लघुकथा (संकलन आणि संपादन - श्रीराम शिधये)
  • लांडगा (कथासंग्रह, १९८९)
  • शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६)
  • साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१)
  • हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. गं.ना. जोगळेकर)

राजेंद्र बनहट्टी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
  • २००२ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ‘त्रैराशिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून हरी नारायण आपटे यांच्या नावाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार
  • गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार
  • पुणे मराठी ग्रंथालय हे दरवर्षी एखाद्या पुस्तकाला राजेंद्र बनहट्टी यांच्या नावाचा एक कथा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके:-
    • छाया महाजन
    • डॉ. रवींद्र शोभणे यांच्या 'चंद्रोत्सव' या कथासंग्रहाला
    • मृणालिनी चितळे यांच्या ‘सिनार’ या कथासंग्रहाला
    • शुभदा गोगटे यांच्या 'घर' या कथा संग्रहास हा पुरस्कार मिळाला आहे.
  • स्वाती चांदोरकर
  • पंकज कुरुलकर यांना ‘साकी, बार ॲन्ड रेस्टॉरंट’ या पुस्तकासाठी