मिलिंदपन्ह
Appearance
मिलिंद पन्ह (मराठी: मिलिंदाचे प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.