संख्या महात्म्य १
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
संख्या १
[संपादन]एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् स्वरूप ’ ’ एकोऽहम् बहु स्याम् ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’च्या मागें आहे. (अंकशास्त्र)
एक अग्नि, एक सूर्य आणि एकच उषा-एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व प्रकाशित करते. एकापासूनच हा सर्व पसारा झाला आहे. (ऋग्वेद ८-५८-२)
एक आत्मा-जगदात्मा.
एककरपद्धति - (अर्थशास्त्र)-सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावरच कर बसविण्याचें तत्त्व म्हणजे सर्व करांचें एकीकरण. (म. श. को.)
एक खांबी-ज्या कुटुंबांत फक्त एकच कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात. एकटाच कर्ता पुरुष असलेलें घर.
एक चक्त-सूर्याचा रथ (प्रामाणिक हिंदी कोश)
एकतत्त्ववाद-या जगांत फक्त एकच सत्य तत्त्व आहे, मग तें भौतिक असो अथवा आध्यात्मिक असो. या तत्त्वज्ञानविषयक मतास एकतत्त्ववाद म्हणतात. (म. ज्ञा. को. विभाग ९)
एक तिथि-अखंड तिथि म्हणजे सूयोंदयापासून कर्मकालपर्याप्त असलेली म्हणजे पूर्ण.
एकदंत-गणपति. एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् । (गणपति अथर्वशीर्षम् ). ’ नमन तुज एक्दंता । एकपणें तूंचि आतां’ (ए. भा. १-२)
एकनाड-पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या जन्मनक्षत्रावरून आद्य, मध्य व अन्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात. जन्मनक्षत्रानुसार येणारी नाडी एकच असेल तर अशा स्त्री-पुरुषांचा विवाह होत नाही. त्यास ’ एकनाड ’ आली असें म्हणतात.
एक परमेश्वर-परब्रह्म वा परमेश्वर (ईश्वर एकच आहे).
एकवाणी, एकवचनी आणि एकपत्नी-मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र.
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम् ।
करिष्ये प्रतिजानेच रामो द्विर्नाभिभाषते ॥
(वा. रा. अयोध्या १९-३०)
द्वि : शरं नाभिसंधत्ते रामो द्विर्नाभिभाषते । (सु.)
एक मूळप्रकृति-आदिमाया.
एकाक्ष-एका डोळ्यानें आंधळा, शुक्ताचार्य.
एकाक्षरी मंत्र-" ॐ ". हें ईश्वराचें उत्तमोत्तम प्रतीक. यासच एकाक्षर ब्रह्म. शब्द ब्रह्म किंवा ॐ कार म्हणतात. ओमिति ब्रह्म । ओमितींद सर्वम् (तैत्तिरीय शिक्षावल्ली) ॐ इत्येतदक्षरमिदम् (मांडुक्य) (आ) द द द म्हणजे दमन, दान आणि दया. प्रजापतीनें अनुक्रमें देव, मनुष्य व असुर या आपल्या तिन्ही अपत्यांस हा एकाक्षरी मंत्र दिला. (बृहदारण्यक अ. ५-२)
एक देव-देव एकच आहे. एको देव : सर्वभूतेषु गूढ : । सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा (श्वेताश्वेतर ६-११)
एकेरी मार्ग-मृत्यूचा रस्ता. या रस्त्यानें जातां येतें ; पण परत येता येत नाही.
एक वेद, एक देव व एकच वर्ण-पूर्वी एकच वेद, सर्व वाड्मया-त्मक प्रणव (ओंकार) एकच, नारायण हा एकच देव, एकच अग्नि, एकच वर्ण व एकच भाषा होती. ’ एकवर्णा: समा भाषा एकरूपाश्व सर्वश: ।’ (वा. रा. उत्तरकांड ३०-१९)
एक एव पुरा वेद : प्रणव : सर्ववाड्मय : ।
देवो नारायणो नान्य एकोऽग्रिर्वर्ण एवच ॥
(भागवत स्कंध ९ अ. १४-४८)
एकाच वृक्षा (देह) वरील दोन पक्षी-१ जीवात्मा आणि २ परमात्मा. ’ द्वा सुपर्णा सयुजा सखाया ’. (मुंडकोपनिषत् )
एक शत्रु-अज्ञान हा मनुष्य जातीचा एक महान् शत्रु आहे. ’ एकः शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुरज्ञानतुल्यः पुरुषस्य राजन् ।’ (म. भा. शांति २९-२८)
एकात्मवाद-आत्मा एक आहे व तो सर्वत्र व्याप्त आहे. हा वेदान्त-शास्त्राचा एक मुख्य सिद्धान्त. मूळ सांख्यशास्त्रकारांना एकात्मवाद मान्य नाहीं. ते आत्मे (पुरुष) अनेक मानतात. " जन्मादि व्यवस्थात : पुरुष बहुत्वम् " (सांख्यसूत्र ६-४५)
एकाचें आश्रयानें असणारे एकवीस गुण-१ रूप, २ रस, ३ गंध, ४ स्पर्शे, ५. एकत्वम् , ६ पृथक्वम् , ७ परिमाण, ८ परत्व, ९ अपरत्व, १० बुद्धि, ११ सुख, १२ दु : ख, १३ इच्छा, १४ द्वेष, १५ यत्न, २६ गुरुत्व, १७ द्ववत्व, १८ स्नेह, १९ संस्कार, २० अद्दष्ट व २१ शब्द. (शब्द कल्पद्रुम)
एकाध्यायी गीता-गीतेचा अठरावा अध्याय. ’ अठरावो अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वांसरूचि गाय दुहे । तैं बेळु कायसा?’ । (ज्ञा. १८-८४)