समुद्र राघू
समुद्र राघू किंवा लाल ढोक (शास्त्रीय नाव: फोनिकोप्टेरिडी फ्लेमिंगो; इंग्लिश: flamingo) हा एक पक्षी आहे आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
[संपादन]आकाराने गिधाडापेक्षा मोठा.उंची अंदाजे चार फुट.लांब पाय.कुसुंबी धुवट रंगाची लांब मान.दिसायला ढोकासारखा.अगडबंब लाल चोच मध्यावर मोडल्यागत वाकलेली.नर-मादी दिसायला सारखेच.काळा काठ असलेल्या व गडद कुसुंबी पंखांच्या या पक्षिगणाचा आकाशात उडताना वळण घेत असतानाचा देखावा मनोहर दिसतो.
वितरण
[संपादन]निवासी आणि भटके.तसेच स्थलांतर करणारे.पाकिस्तान (सिंध),संपूर्ण भारत,नेपाळ तराई, बांगलादेश आणि श्रीलंकेतआढळतात.कच्छच्या रणात सप्टेंबर/ऑक्टोबर ते मार्च/एप्रिल या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]दलदली,सरोवरे,चिखलाणी आणि खाड्या.
छोटा समुद्रराघू
[संपादन]इंग्रजीमध्ये lesser flamingo म्हणतात.मराठीमध्ये छोटा समुद्रराघू (पुरुष),बांडी (स्री)असे म्हणतात.हिंदीत छोटा राजहंस.गुजरातीत नानो बालो, नानो हंज.आणि तेलगुमध्ये चिन्नराजहंस असे म्हणतात.