Jump to content

केशव सखाराम देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


केशव सखाराम देशमुख हे एक मराठी लेखक आणि कवी आहेत. ते मराठी भाषा हा विषय घेऊन एम.ए.पीएच.डी. झाले आहेत. बी.ए.च्या आणि एम.ए.च्या अंतिम परीक्षांत ते मराठवाडा विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. मेरतमध्ये आल्याबद्दल त्यांना विद्यापीठाची चौदा पारितोषिके प्राप्त झाली होती. पीएच.डी. झाल्यावर ते नांदेड विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि पुढे मराठी विभागाचे प्रमुख झाले.

केशव सखाराम देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अथक (कवितासंग्रह)
  • गाभा (कवितासंग्रह)
  • चालणारे अनवाणी पाय (कवितासंग्रह)
  • तंतोतंत (कवितासंग्रह)
  • पाढा (कवितासंग्रह)
  • पीकपाणी (संपादित)
  • फ.मुं. शिंदे यांची काव्यप्रतिभा (फ.मुं शिंदे यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या कवितांची सूची आणि काही कवितांचे रसग्रहण)
  • भाषाचिंतन (मराठीविषयक ४३ लेखांचा संग्रह)
  • राजश्री शाहू यांची भाषणे (संपादित)
  • साहित्य समाज आणि संस्कृती (संपादित)
  • सौंदर्यशास्त्र (संपादित)

के.द. देशमुखांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीकडून देशमुखांच्या कवितांचे इंग्रजी, उर्दू, कोकणी, गुजराती व सिंधी भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध.
  • साहित्य अकादमीच्या कविता अनुवाद कार्यशाळेत निमंत्रित कवी म्हणून सहभाग.
  • मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आणि नांदेड विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांत देशमुखाच्या कवितांचा समावेश झाला आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात तीन कविता समाविष्ट.
  • औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य.
  • जालना येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त.
  • उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे मराठी पाठ्य पुस्तक- 'युवकभारती'चे संपादक सदस्य.
  • एम.फिल., पीएच.डी.चे मार्गदर्शक.
  • महाराष्ट्र शासनाच्या, साहित्य संस्कृती मंडळाच्या, तसेच महाराष्ट्रातील भिन्न-भिन्न मराठी वाङ्मय पुरस्कार निवड समितींवर तज्ज्ञ परीक्षक म्हणून कार्य.
  • देशमुखांव्या कवितांना मिळालेले पुरस्कार -

१) कवी केशवसुत राज्य पुरस्कार, महाराष्ट्र पुरस्कार
२) महाराष्त्र सरकारचा बालकवी पुरस्कार
३) कोपरगावचा भी.ग.रोहमारे ग्रामीण पुरस्कार
४) येशवंत चव्हाण पुरस्कार, पुणे
५) शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
६) ना.ध. देशपांडे पुरस्कार, मेहकर
७) नानासाहेब वैराळे पुरस्कार, अकोला
८) संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, अहमदनगर
९) विशाखा काव्य पुरस्कार, नाशिक.
१०) साहित्य साधना पुरस्कार, यवतमाळ.
११) सुजाता पाब्रेकर पुरस्कार, मुंबई.
१२) धोंडीबा माने पुरस्कार, औरंगाबाद
१३) साहित्य सेवा वाड्मय पुरस्कार, नाशिक रोड.