संख्या महात्म्य ३
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
*संख्या* ३
[संपादन]तीन वासना -
[संपादन]१ लोकवासना ( लोकांनीं चांगलें म्हणावें म्हणून ), २ शास्त्रवासना ( शास्त्राध्ययनाची आवड ) आणि ३ देहवासना ( वेशभूषा वगैरेंनीं चांगलें दिसावें म्हणून खटपत ). यांमुळें जीवांना खरें ज्ञान होत नाहीं . यांनाच वासनात्रय म्हणतात .
तीन वारकरी वैशिष्टयें -
[संपादन]१ टाळ , २ माळ आणि ३ पताका . हीं तीन वारकरी सांप्रदायिकांस धारण करावीं लागतात .
तीन विद्या -
[संपादन]१ प्रकृति विद्या २ आत्मविद्या - आध्यात्मिकज्ञान आणि ३ ब्रह्मविद्या . यांच्या अध्ययनानें ऐहिक सुखआणि अमृतत्त्व प्राप्त होतें ( अथर्व - अनु - मराठी )
तीन विद्याप्राप्तीचीं साधनें -
[संपादन]१ गुरूशुश्रूषा , २ पुष्कळ धन आणि ३ विद्या देऊन विद्या घेणें ." गुरूशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा ।अथवा विद्यया विद्या चतुर्थं नोपपद्यते ॥ " ( सु . )
तीन विद्येचे शत्रु -
[संपादन]१ गुरूशुश्रूषेचा अभाव , २ त्वरा आणि ३ आत्मश्लाघा ." अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रुवत्त्रयः ॥ " ( म . भ . उद्योग ४० - ४ )
तीन विश्रांतिस्थानें सांसारिकांस -
[संपादन]१ पुत्र , २ पत्नी आणि ३ सज्जनसमागम .संसारतापदघानां त्रयो विश्रांतिहेतबः ।अपत्यंच कलत्रंच संतसंगतिरेवच ॥ ( सु . )
तीन वेळां विश्वरूपदर्शन -
[संपादन]पहिलें - धृतराष्ट्राच्या राज्यसभेत शिष्टाईस गेल्या वेळीं , दुसरें - अर्जुनास गीता उपदेशितांना आणि तिसरें - युधिष्ठिरास राज्याभिषेकझाल्यानंतर द्वारकेस परत जात असतां , उत्तंक नांवाच्या तपोधन ऋषीस त्याचे विनंतीवरून श्रीकृष्णानें विश्वरूपदर्शन दिलें . ( भगवान् श्रीकृष्ण )
तीन वैभवलक्षणें -
[संपादन]१ दुसऱ्याच्या गोष्टींत ढवळाढवळ न करणें , २ आपल्या कामामध्यें मग्न असणें आणि ३ मिळालेल्या संपत्तीचें रक्षण करणें . हींद तीन वैभव प्राप्त होण्याचीं लक्षणें होत .अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् ॥ ( म . भा . सभा . ५४ - ७ )
तीन व्यसनें
[संपादन]( कामापासनून उत्पन्न होणारीं )-१ मिथ्या भाषण , २ परस्त्रीगमन व ३ वैरावांचून क्रर कर्म . हीं तीन व्यसनें कामापासून उत्पन्न होणारीं . ( वा . रा . अरण्य . ९ - ३ )
तीन व्याह्रति गायत्रीमंत्राच्या -
[संपादन]१ भूः ( पृथ्वी ) २ भुवः ( अंतरिक्ष ) आणि ६ स्वः ( स्वर्ग )
तीन वृत्ति
( शब्दाची अर्थबोधक शक्ति )-१ अभिधा , २ लक्षणा आणि ३ व्यंजना . अर्थ ज्या शक्तीमुळें बोधित होतो ती वृत्ति . कांहीं" तात्पर्य " नामक चौथी वृत्तीहि मानतात .
तीन शरीरें -१ स्थूल शरीर
( पंचमहाभूतांच्या पंचीकरणानें बनलेलें ), २ सूक्ष्म शरीर ( मनु , बुद्धि , पंचज्ञानेंद्रियें , पंचकर्मेंद्रियें व पंचाप्राण यांचें ) आणि ३ कारणशरीर ( अविद्या ). अशीं तीन शरीरें आत्म्याला असतात .
तीन शक्ति -
[संपादन]१ ज्ञानशक्ति , २ क्रियाशक्ति आणि ३ अर्थशक्ति . ( देवी . भाग . तृतीयस्कंध ७ - २५ )
तीन शत्रू चंद्राचे -
[संपादन]१ कावळा , २ चोर आणि ३ विरही ( चंद्रप्रभा )
तीन शास्ते -
[संपादन]( जगाचे नियंत्रण करणारे )- १ मनोनिग्रही माणसाचा शास्ता गुरू , २ दुष्टांचा शास्ता राजा ( शास्नाधिकारी ) आणि ३ गुप्तपणें पाप करणारांचा प्रत्यक्ष यमच . हे तीन शास्ते होत .गुरूरात्मावतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ ( म . भा . उ . ३५ - ७१ )
तीन ’स ’ कार प्रतिष्ठा वाढविणारे -
[संपादन]१ संपत्ति , २ सन्मान आणि ३ सत्ता .
तीन सत्ता -
[संपादन]१ पारमार्थिक सत्ता , २ व्यावहारिक सत्ता आणि ३ प्रातिभासिक सत्ता ( वेदान्तशास्त्र )
तीन सप्तक
[संपादन]( गायनशास्त्र )-१ मंद्र , २ मध्य आणि ३ तार .
तीन संग्रहणीय वस्तु -
[संपादन]१ ग्रंथ , २ स्नेही व ३ औषधी . यांचा संग्रह करावा .
तीन संप्रदाय व त्यांचीं घोषणावाक्यें
[संपादन]( द्त्त उपासकांचे )-१ गुरू संप्रदाय - श्रीगुरुदेवदत्त , २ अवधूतसंप्रदाय - अबधूत चिंतन श्रीगुरुदेवद्त्त . ३ आनंद संप्रदाय - आनंदे द्त्तात्रय देवदेव . ( दासोपंतांची पासोडी - प्रस्तावना )
तीन साधनें ( तिघांना आपलेसे करून घेण्याची )-
[संपादन]१ वृद्ध - इष्ट वस्तूचें दान , २ बालक - प्रेचळ अंतःकरन आणि ३ विद्वान् - मधुरवाणी .
तीन साधनें ब्रह्मविद्या शिकण्याचीं -
[संपादन]१ श्रद्धा , २ भक्ति व ३ घ्यान ( कैवल्योपनिषद् १ - २ )
तीन साधनें ज्ञानप्राप्तीचीं -
[संपादन]१ प्रत्यक्ष , २ अनुमान आणि ३ आगम ( शास्त्र )’ प्रत्यक्षानुमानागमाभ्याम् ’ ( पातंजलयोगशास्त्र )
तीन सिद्धि -
[संपादन]१ व्यवहार सिद्धि , २ अलौकिक सिद्धि म्हणजे अणिमा लघिमा इ . सिद्धि आणि ३ अत्यंत दुःखनिवृत्ति व परमानंद प्राप्तिरूप सिद्धि . ( हरिपाठ रहस्य )
तीन सांस्कृतिक गर्जना महाराष्ट्रधर्माच्या -
[संपादन]१ पुंडलिक वरदे हरि विठ्ठल , २ हरहर महादेव आणि ३ जयजय रघुवीर समर्थ. ( महाराष्ट्रा जीवन )
तीन स्थानीं गंगा विशेष पुण्यपद -
[संपादन]१ तीर्थराज प्रयाग , २ हरिद्वार व ३ गंगासागर संगम . ( गूढार्थचंद्रिका )
तीन सौंदर्यें -
[संपादन]१ विचारसौदर्य , २ गुणसौंदर्य व ३ मनोसौंदर्य .
तीन स्थानें ध्वनीचीं -
[संपादन]१ ह्रदय , २ कंठ व ३ मूर्ध्नया स्थानांतून अनुक्रमें मंद्र , मध्यम व तार हे स्वरालाप उगम पावतात . ( गायनशास्त्र )
तीन स्थानें ( पवित्र )-
[संपादन]१ अवतारांची जन्मभूमि , २ संतांचीमृत्युभूमि आणि ३ वीरांची कर्मभूमि . ( विचार पोथी )
तीन स्थानें भगवान् सूर्यदेवतेचीं -
[संपादन]१ उदयकाल - पूर्वदेशाच्या पर्वतावर -- कोणार्कजवळ , २ मध्यान्ह - कनोजच्या दक्षिणेस कालप्रिय( कालपी ) येथें व ३ अस्तमान - मूलस्थान ( मुलतान ). चंद्रभागा ( चिनाव ) कांठीं . अशीं तीन स्थानें श्रीकृष्णपुत्र सांबानें स्थापन केलीं . ( वराह पु . अ . १७८ )
तीन स्वर -
[संपादन]१ उदात्त , २ अनुदात्त व ३ स्वरित .
तीन स्कंध ( विभाग ) ज्योतिषाचे -
[संपादन]१ सिद्धान्त , २ संहिता आणि ३ होरा .
तीन हट्ट -
[संपादन]१ बालहट्ट , २ स्त्रीहट्ट आणि ३ राजहट्ट .
तीन हेतु तीर्थप्राशनाचे -
[संपादन]१ देहशुद्धि , २ धर्मसाधन आणि ३ मोक्षप्राप्ति असे तीन हेतु तीर्थ घेण्याचे क्रमानें सांगितले आहेत .प्रथमं कायशुद्धयर्थं द्वितीयं धर्मसाधनम् ।तृतीयं मोक्षमाप्नोति एवं तीर्थं त्रिधा पिबेत् ॥ ( क्रग्वेदी ब्रह्मकर्म )
तीन हेतु ( विवाहाचे )-
[संपादन]१ धर्मसाधन , २ प्रजोत्पत्ति व ३ रतिसुख . " धर्मप्रजारत्यर्थां ही विवाहः । "तीन हास्यें -१ सुप्तहास्य , २ स्पितहास्य आणि ३ व्यक्तहास्य . असे हास्याचे तीन प्रकार .
तिघांना आश्रयाविना शोभा नाहीं -
[संपादन]१ विद्वान , २ स्त्री आणि ३ वेली .विनाश्रयं न शोभन्ते पण्डितावनितालताः । ( सु . )
तिघेजण जगांत निंद्य -
[संपादन]१ लग्न केल्यानंतर पत्नीला टाकणारा पति , २ बापाचे पश्चात् आईचें भरणपोषण न करणारामुलगा आणि ३ उपवर मुलीचा योग्य वेळीं विवाह न करून देणारा बाप . ( सावित्रीचरित्र )
तिघांच्या तीन प्रकारें परीक्षा -
[संपादन]१ सोन्याची - अग्नीनें, २ स्त्रियांची - सोन्यानें व ३ पुरुषाची परीक्षा - स्त्रियांनीं . ( विनोद महदाख्यायिका )
तिघांना तीन प्रकारचें भय असतें -
[संपादन]१ कनिष्ठ वर्गांना बेकारीचें भय , २ मध्यम वर्गीयांना मरणाचें भय आणि ३ उच्चवर्गीयांना अपमानाचें भय .अवृत्तेर्मयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ।उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् ( म . भा . उ . ३४ - ५२ )
तिघेजण दुर्दैवी -
[संपादन]१ जुगारानें धनप्राप्ति , २ सेवा करून मान आणि ३ भिक्षेनें भोग मिळण्याची इच्छा करणारा . हे तिघे दुर्दैवी होत .द्यूतेन धनमिच्छन्ति मानमिच्छन्ति सेवया ।भिक्षया भोगमिच्छन्ति ते दैवेन विडम्बिताः ॥ ( सु . )
तिघेजण नामधारी होत -
[संपादन]१ नांव विद्याधर पण मूर्ख , २ नांव दिवाकर पण जन्मांध व ३ नांव लक्ष्मीधर पण दरिद्री . कृति व आकृति यांत विसंगति असली म्हणजे हा संकेत उपयोजिला जातो .विद्याधरो यथा मूर्खों जन्मांधश्च दिवाकरः ।लक्ष्मीधरो दरिद्रश्च - त्रयस्ते नामधारकाः ॥ ( सु , )
तिघांचा नाश अटळ -
[संपादन]१ अज्ञ - ज्ञान नसणारा , २ अश्रद्ध - स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरूषाच्या वचनांवर विश्वास न ठेवणारा आणि ३ संशयात्मा - ज्ञानी सांगतात त्याविषयीं सतत संशय घेणारा .
तिघांना नरक मिळतो -
[संपादन]१ जन्मदाता , २ प्राणदाता व ३ विश्वासघातकीमित्रद्रोही कृतघ्नश्च योहि विश्वासघातकःते नरा नरकं यान्ति यावच्चंद्रदिवाकरौ ( विक्रमचरितम् )
तिघेजण पित्यासमान -
[संपादन]१ जन्मदाता , २ प्राणदाता व ३ अन्नदाता .शरीरकृत प्राणदाता यस्य चान्नानि भुंजते ।क्रमेणैते त्रयोऽप्युक्ताः पितरो धर्मशासने ॥ ( म . भा . आदि ७२ - १५ )
तिघेजण पृथ्वीचा उपभोग घेणारे -
[संपादन]१ शूर , २ विद्यासंपन्न आणि ३ सेवा कशी करावी हें जाणणारा . ( म . भा . उद्योग ३५ - ७४ )
तिघेजण महाभारताचे ( आजच्या ) कर्ते -
[संपादन]१ व्यास - जय , २ वैशंपायन - भारत आणि ३ खौती - महाभारत ( म . भा . उपसंहार )
तिघेजण यज्ञ न करितां स्वर्ग प्राप्त करून घेतात -
[संपादन]१ अन्नदान करणारा , २ पाणपोई घालणारा आणि ३ रोगी बरा करणारा. या तिघांना यज्ञ न करितां स्वर्ग ( उत्तम गति ) प्राप्त होते .अन्नदो जलद्श्चैव ह्यातुरस्य चिकित्सकः ।त्रयस्ते स्वर्गमायान्ति विना यज्ञेन भारत ॥ ( योगरत्नाकर )
तिघेजण वक्रोक्तिमार्गनिपुण -
[संपादन]१ सुबंधु , २ बाणभट्ट आणि ३कविराज - ( राघवपाण्डवीय काव्याचाः कर्ता ) हे तीन संस्कृत वाङ्मयांत वकोक्तिमार्गनिपुण असे कवि होऊन गेले .सुबंधुर्बाणभट्टश्च कविराज इति त्रयः ।वक्रोक्तिमार्गनिपुणाश्चतुर्थों विद्यते न वा ॥ ( रा . पा . १ - ४१ )
तिघेहि सुखी असावेत -
[संपादन]१ अन्नदाता , २ भोजन करणारा व ३ स्वयंपाक करणारा ." अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भवेत् । " ( सु . )