Jump to content

रामदास फुटाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामदास फुटाणे ( जामखेड-जिल्हा अहमदनगर, १४ एप्रिल १९४३; हयात) हे महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे.

रामदास फुटाणे १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक होते.

ग्रंथसाहित्य

[संपादन]
  • कटपीस : हिंदी कवितासंग्रह (१९६९)
  • सफेद टोपी लाल बत्ती : मराठी कवितासंग्रह (१९८६)
  • चांगभलं : मराठी कवितासंग्रह (१९९०)
  • भारत कधी कधी माझा देश आहे : मराठी कवितासंग्रह(१९९७)
  • फोडणी : मराठी कवितासंग्रह (२००१)
  • कॉकटेल : मराठी कवितासंग्रह (२००२)

चित्रपट निर्मिती, लेखन, दिग्दर्शन

[संपादन]
  • सामना (चित्रपट) -१९७५ निर्मिती
  • सर्वसाक्षी (चित्रपट) -१९७९ पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन
  • सुर्वंता (चित्रपट) -१९९४ दिग्दर्शन
  • झुंड (हिंदी चित्रपट) - २०२२ कलाकार (भूमिका: कॉलेज प्रिन्सिपल)

पुरस्कार

[संपादन]
  • सामना (चित्रपट) : ३ राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर अवॉर्ड्‌स आणि राज्य पुरस्कार. १९७५ च्या बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, आणि महोत्सवात सहभाग.
  • सर्वसाक्षी (चित्रपट) : बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हॉंगकॉंग येथे झालेल्या ५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड.
  • सुर्वंता (चित्रपट) : उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५चा राज्य पुरस्कार; १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार; उत्कृष्ट दिग्दर्शनाचा १९९५चा वसंत जोगळेकर पुरस्कार.
  • ’भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश (१९९८).
  • ’फोडणी’ला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार (२००१)
  • गोवा कला अकादमीचा काव्यहोत्र पुरस्कार (२४-७-२०१६) : दोन लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्रक

(अपूर्ण)