Jump to content

ब्राझीलचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्राझीलचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वी सुरू होतो. ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८९ च्या उठाव्यानंतर ब्राझीलमध्ये गणतन्त्रावादी सर्कार बसले. ब्राझीलमध्ये दोन वेळा हुकुमशाही आली होती आणि एकदा सैन्याचे राज्य आले होते.

ब्राझिलची सुरुवात

ब्राझीलमध्ये पहिले कोण आले याच्यावर बरीच चर्चा झाली आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की कॅब्रालच ब्राझीलला प्रथम आला. पण काही लोकांचे मानाने आहे की ब्राझीलमध्ये प्रथम पाचेको हा आला. पण ब्राझीलवर पोर्तुगालचे राज्य फक्त कॅब्राल आल्यानंतरच सुरू झाले. कॅब्रालच्या लोकांना ब्राझीलमध्ये अनेक आदिवासी टोळ्या सापडल्या. त्या टोळ्यांची एकमेकातच खूप युद्ध व्हायची. पोर्तुगालला भारत, चीनइंडोनेशिया या देशांकडून खूप संपत्ती मिळत असे. त्यामुळे ब्राझीलकडे त्यांचे फारसे लक्ष नव्हते. पोर्तुगालने ब्राझील आरामात आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता एक युक्ती लढवली. त्यांनी ब्राझीलचे अनेक भाग पाडून ते भाग पोर्तुगीज सावकारांना दिले.

ब्राझील वरील राज्य

१७व्या शतकात ब्राझीलमध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. गुलामांना पोर्तुगीज लोक शेतांमध्ये कामाला लावत असे. उसापासून साखर बनवून ती युरोपात घेऊन जात असे. पहिल्या दोन शतकांमध्ये फ्रांस, स्पेन व इटालियन लोकांनी सुद्धा ब्राझीलमध्ये आपल्या बस्त्या बसविल्या. पण पोर्तुगालला सर्वात जास्त त्रास डच लोकांचा झाला. डच लोकांनी ब्राझीलच्या किनाऱ्याचा एक मोठा भाग ताब्यात घेतला. त्याने पोर्तुगीजांना व्यापारात त्रास होऊ लागला. त्यांनी डच बस्तीवर घेरा घातला. अनेक वर्षांच्या युद्धानंतर डच लोक १६६१ साली ब्राझील सोडून गेले.

ब्राझीलमध्ये ९० वर्षांकरिता राजशाही होती. नेपोलियनने जेव्हा पोर्तुगालवर हल्ला चढवला तेव्हा पोर्तुगालने आपले बरेच लोक ब्राझीलला हलवले होते. रियो दी जानेरोला ते लोक राहायला लागले. पोर्तुगालच्या राजाने तिथूनच आपले राज्य १५ वर्ष चालवले. १८२१ साली राजा पोर्तुगालला परत गेला. त्याचा मुलगा, पेड्रो, ब्राझीलवर राज्य करायला रियो दी जनेरोमध्येच थांबला. पण पेड्रो ब्राझीलवर नीट राज्य करू शकला नाही. तो १८३१ साली पोर्तुगालला परत आला. ९ वर्षांकरिता ब्राझीलवर राज्य करण्यासाठी राजाच नव्हता. या काळात साबिनाडा सारखे अनेक उठाव ब्राझीलमध्ये झाले. त्या नंतर पेड्रोचा मुलगा म्हणजे दुसरा पेड्रो याने ब्राझीलचे राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले.

१५ नोव्हेंबर, १८८९ला ब्राझीलमध्ये सैन्याने उठाव केला आणि जनरल डीयोडोरो डा फोन्सेका हा ब्राझीलचा राजा बनला. १९३० सालापर्यंत ब्राझील लोकशाही होती पण बायका व अशिक्षित लोकांना मतदानाचा हक्क नव्हता.

१९३० सालानंतर ब्राझीलमध्ये विविध सरकारने त्या देशाची प्रगती केली. गेतुलिओ वर्गास याने ब्राझीलवर १९३० ते १९४५ पर्यंत ब्राझीलवर राज्य केल. या काळात त्याला दोन उठावांना तोंड द्यावे लागले. १ साली साम्यवाद्यांनी/ कम्युनिस्टांनी साली आणि फॅसिस्टानी १९३८ साली असे दोन वेगळे उठाव केले. १९४५ पासून १९६४ पर्यंत ब्राझीलमध्ये लोकशाही पसरली. या काळात ब्राझीलची राजधानी रिओ दे जानेरो पासून ब्राझिलीयाला बदलली. ब्राझीलने अटलांटिकच्या युद्धात व इटलीमध्ये अमेरिकेचा साथ दिला.

हुकुमशाही

१९६४ च्या सुमारास ब्राझीलच्या सेनेचे असे मत झाले होते की हे सरकार बरोबर नाही व यावर उठाव केला पहिजे. मिनास गेरासचा राज्यपाल, जोसे दे मगल्हेस पिंटो, याने या उठावाला सहभाग दिला. हुकुमशाही आल्यावर सुरुवातीला प्रचंड प्रगती झाली. पण हुकुमशाही मुळे अनेक ब्राझीलियन कैद्यांचे खून केले गेले. या मुळे ब्राझीलमध्ये अशांती पसरली.

ब्राझीलचे राष्ट्रपती, लुला (2003-2011)

लोकशाही

१९८५ मध्ये ब्राझील परत लोकशाही कडे वळला. २००२ मध्ये लुला ब्राझीलचा प्रधानमंत्री झाला. त्याच्या एका योजनेमुळे ब्राझीलमधील प्रत्येक माणसाला दिवसातून ३ जेवणं मिळायची. २०१० मध्ये लुलाच्या दोन टर्म झाल्यामुळे तो परत निवडणुकीला उभा राहू शकला नही. त्यामुळे दिल्मा रुसेफ राष्ट्रपती झाली. १ जानेवारी, २०११ रोजी ती राष्ट्रपती झाली.