सी-डॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सी-डॅक (इंग्लिश भाषा:C-DAC) पुण्यातील एक सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था स्थळ

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग (प्रगत संगणन संस्था) अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या साहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८०००ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅकच्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.


आता सध्या जे भारतीय भाषेत मी हे लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत साधारणतः १५ भारतीय भाषालिहीण्यासाठीची ISCII [indian script code for information interchange] ( ईस्की ) कोडच्या निर्मितीत देखील सी-डॅकचा हातभार आहे. भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी जी भारतीय भाषांसाठी INSCRIPT KEY BOARDची निर्मिती केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहीता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टींग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता हे INSCRIPT KEY BOARDचे वैशिष्ट आहे. लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करून भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करून देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट , ओरॅकल हया सारख्या कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करून दिला आहे त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये सी-डॅकच्या ISCII कोडचा अंतर्भाव केल्या मुळे विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा सारख्या सिस्टम मध्ये भारतीय भाषेत दस्तावेज करता येतात.

लिनक्स मध्ये ज्या Keyboard LayOuts बनवण्यात आल्या आहेत त्यांमधील काही LayOuts सी-डॅकच्या INSCRIPT KEY BOARD वर आधारीत आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]