विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्व रूपवर्धिनी,पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी 'स्व'रूपवर्धिनी,पुणे व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.प्रा.राम डिंबळे यांनी आशयाबाबत सविस्तर विवेचन केले. सदर कार्यशाळेत एकूण ६ जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली. या कार्यशाळेत कल्याण (पुणे),लव्हार्डे,मेट पिलावरे,कोलंबी (वेल्हे),मांजरी खुर्द‎ हे लेख संपादित केले गेले.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून 'स्व'रूपवर्धिनी येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यरत संपादक
संपादन स्मार्टफोनवर...

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • मंगळवार दि.७ फेब्रुवारी २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --विवेक गिरिधारी (चर्चा) १३:५३, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  2. --सागर शिंदे (चर्चा) १३:५५, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  3. --राम डिंबळे (चर्चा) १३:५७, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  4. --निलेश धायरकर (चर्चा) १३:५९, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  5. --धर्मराज वीर (चर्चा)
  6. --मेघा नगरे (चर्चा)