Jump to content

सदस्य:धर्मराज वीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रंथालयातील सुरक्षिततेचे उपाय १) ग्रंथालयात झेरोक्स सुविधा वाचकांना परवडेल अशा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात यावी . २) ग्रंथालय सभासद पत्राची नियमित तपासणी करून ज्या वाचकांनी देय दिनांका नंतरही ग्रंथ परत केले नाहीत त्यांना स्मरणपत्रे पाठवणे त्याविषयी ई –मेल करणे, दूरध्वनी करणे , एस.एम.एस करणे. ३) ग्रंथालयामध्ये जाण्या येण्यासाठी एकच प्रवेशदार ठेवणे. ग्रंथालयातील खिडक्यांना बारीक जाळी बसवणे इत्यादी उपाययोजना करता येतील. ४) ग्रंथालयातील कर्मचार्यांनी वाचकांशी वयेक्तिक संबंधाचा विचार न करता ग्रंथालयीन कर्तव्य व्यवस्थित पार पाडावेत. ५) ग्रंथालयातील कर्मचार्यांनी वाचकांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या ब्यग्स, सामान ग्रंथालयाबाहेर जाण्याअगोदर तपासणे अनिवार्य करावे. ६) उपयुक्त व प्रसिद्ध ग्रंथाची मागणी पाहता त्यानुसार ग्रंथाची उपलब्धतता करण्यावर ग्रंथालयाने कार्य करावे. ७) वाचकांना ग्रंथालयाची व ग्रंथ व्यवहाराची माहिती देवून ग्रंथ संपत्तीचे महत्व वाचकांना समजावून सांगावे. ८) ग्रंथ गणना शक्य झाल्यास दरवर्षी करून ग्रंथसंख्या अद्यायवत ठेवणे आवश्यक आहे. ९) ग्रंथालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जसे की सी. सी. टी .वी कॅमेरे लावणे,थ्री.एम. सिक्यूरीटी गेटचा वापर करणे, आर.फ.आय.डी तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी. १०) वाचक व ग्रंथालय कर्मचार्यांना स्वतःच्या ब्यग्स प्रॅiपरटी काउंटरवरच ठेवणे अनिवार्य करावे. ११) ग्रंथ चोरी करताना एखादा वाचक आढळल्यास त्याचे सभासद्पत्र रद्ध करून त्याला काही प्रमाणात दाणाद लावावा व त्याचे छायाचित्र आणि माहिती ग्रंथालयाच्या सूचनाफलकावर लावावी जेणेकरून ईतर वाचकांची समाजात अपमान होण्याच्या भीतीने ग्रंथ चोरी करण्याची हिंमत होणार नाही. १२) तसेच ग्रंथचोरी मध्ये वाचाकासोबत ग्रंथालयीन कर्मचारी आढळून आल्यास अशा कर्मचाऱ्यावर त्या संस्थेच्या नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी.

   संदर्भ 

1) Grewal, Gagandeep (2004) Handbook of Library security, 1st Ed., New Delhi: Dominant Publisher & distributors. 2) Onohwakpor, J.E.(2006) Theft and Mutilation of Library Materials in delta state University Library, Abraka. Library Movement 28(1), Pp.1-10. 3) Ranganathan, S.R.(2010) Mutilation of books in libraries: An inequitable policy. Library Herald 11(4), January, Pp.283-285 4) Singh Sewa(1992) Mutilation, Theft and Misplacement of Reading materials in Libraries. Indian Journal of Information, Library & Society 5(2), January-June, Pp.48-54. 5) Thilainayagam Ve. (1997) New Dimension of Library Scenario in India, 1st Ed., New Delhi:Ess Ess Pub., Pp.95-106. 6) Vyas, S.D. and Panwar, B.S. (1975) Loss of Books in Libraries. Herald of Library Science 14(4), October, Pp.238-241.