Jump to content

भारतीय निवडणुकांतील उमेदवाराचे अ व ब प्रपत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील कोणत्याही निवडणुकीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जाहिर होण्यास, त्या उमेदवाराला, संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे (निवडणूक निर्णय अधिकारी) आपला उमेदवारीचा अर्ज सादर करतेवेळी, 'अ' व 'ब' प्रपत्र ('ए' व 'बी' फॉर्म) सादर करावा लागतो. या प्रपत्राच्या (फॉर्मच्या) आधारे 'अमुक एक उमेदवार अमुक एक पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे', हे जाहिर करण्यात येते व तशी निवडणुकीशी संबंधीत कागदपत्रात, दस्तऐवजात नोंद करण्यात येते.[]हे दोन्ही फॉर्म एकत्रितच सादर करावयाचे असल्याने,निवडणुकीच्या भाषेत यांना 'एबी फॉर्म' असेच संबोधण्यात येते. हे दोन्ही फॉर्म एकमेकांवर अवलंबून असतात. कोणताही एकच फॉर्म सादर केल्यास त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बहुदा नामंजूर करण्यात येतो.[ संदर्भ हवा ]

राज्य निवडणूक आयोग अथवा भारतीय निवडणूक आयोग आपापल्या अधिकारात, हे फॉर्म सादर करण्याची पद्धत बदलू शकतो किंवा यथायोग्य पर्याय देऊ शकतो.[ संदर्भ हवा ]

अ प्रपत्र (ए फॉर्म)

[संपादन]

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने एखाद्या विशिष्ट निवडणूक क्षेत्रातील, एखाद्या विशिष्ट ठिकाणची उमेदवारी निश्चित करण्याची जबाबदारी कोणावर सोपविलेली आहे हे यात स्पष्ट केलेले असते.[]

ब प्रपत्र (बी फॉर्म)

[संपादन]

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून एखाद्या विशिष्ट निवडणूक क्षेत्रातील, एखाद्या विशिष्ट ठिकाणची उमेदवारी कोणास दिल्या गेली आहे, हे यात नमूद केलेले असते.[]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c ई-पेपर लोकमत, नागपूर, पान क्र. ४ मथळा:थेट आयुक्तांकडेच एबी फॉर्मची यादी Check |दुवा= value (सहाय्य). दिनांक ०३/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा

[संपादन]