चंद्रकांत प्रभाकर देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे (जन्म १२ मे १९४६[१] - ) तथा चं. प्र. देशपांडे हे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी लिहिलेली बुद्धिबळ आणि झब्बू, डावेदार[२], ढोलताशे[३], जणू काही वास्तव इ. नाटके प्रसिद्ध आहेत.

शिक्षण व आयुष्यक्रम[संपादन]

चंप्र ह्यांचा जन्म विलेपार्ले, मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण विजापूर आणि मुंबई येथे झाले[१]. १९६९ ते १९९६ या कालावधीत ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत होते. १९९६ साली त्यांनी डेप्युटी चीफ ऑफिसर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली[१]. नाटके तसेच एकांकिका यांची १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c चंप्रलेखन ह्या संकेतस्थळावरील अल्पपरिचय Archived 2016-10-24 at the Wayback Machine. ह्या विभागातील माहिती. दि. २३ जानेवारी २०१७ रोजी ००:३६ वाजता पाहिल्याप्रमाणे
  2. ^ दै. लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीतील नव्वदोत्तरी नाटकं ह्या लेखमालेत २८ जून २०१५ रोजी प्रकाशित झालेला डावेदार हा लेख. दै. लोकसत्तेच्या संकेतस्थळावर दि. २३ जानेवारी २०१७ रोजी ००:५० वाजता पाहिल्याप्रमाणे
  3. ^ दै. लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीतील नव्वदोत्तरी नाटकं ह्या लेखमालेत २८ जून २०१५ रोजी प्रकाशित झालेला ढोलताशे हा लेख. दै. लोकसत्तेच्या संकेतस्थळावर दि. २३ जानेवारी २०१७ रोजी ००:५० वाजता पाहिल्याप्रमाणे

बाह्य दुवे[संपादन]

प्र. देशपांडे ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]