रूप करनानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रूप करनानी (इ.स. १९५४ - ३१ डिसेंबर, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) हे भारतातील इंग्लिश पत्रकार होते. हे पुण्यात राहत असत.

त्यांनी टेल्कोमध्ये १० वर्षे अभियंता म्हणून काम करीत असताना इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, मनी ऑपॉर्च्युनिटीज, श्री प्रॉफिट, इंडियन पोस्ट आणि दइंडिपेन्डन्ट आदी नियतकालिकांमध्ये लेखन केले. त्यानंतर इ.स. १९८९मध्ये आधी बिझनेस इंडिया आणि मग २००० साली बिझिनेस टुडे या नियतकालिकात ते सहायक संपादक झाले. नंतरच्या काळात त्यांनी इन्स्पिरेशन्स पी.आर. या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना केली. त्या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक होते.

करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के. फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.

करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वाणिज्य आणि विधी या विषयांच्या पदवीधर असून सॉफ्टवेअरतज्ज्ञ आहेत. त्या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनी आणि अन्य काही कंपन्यांच्या निदेशक आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • इंडिया ट्रॅव्हेल अवॉर्ड फॉर बेस्ट कम्युनिकेटर (जुलै २०१४)
  • पीआर काउन्सिल ऑफ इंडिया(PRCI)कडून चाणक्य पुरस्कार (२०१५)
  • रोटरी अवॉर्ड फॉर लाईफटाइम अचिव्हमेन्ट (२००९-१०)