बी.एन. देशमुख
बलभीमराव नरसिंगराव देशमुख (१९ जानेवारी, इ.स. १९३५ - ) हे एक निवृत्त मराठी न्यायाधीश आहेत. ते बी.एस्सी. एल्एल.बी, D.I.A.(London) असून १९६३सालापासून मुंबई उच्च न्यायालयात वकील होते. न्यायालयाच्या औरंगाबाद शाखेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८२पासून ते औरंगाबादेत वकिली करू लागले. वकील असतानाच ते १९७८ ते १९८४ या कालांत महाराष्ट्र विधानपरिषदेत नामदार होते.
देशमुख मुंबई हायकोर्टात १२-११-१९८६ पासून अतिरिक्त न्यायाधीश, आणि १२-६-१९८७पासून स्थायी नायाधीश म्हणून काम पाहू लागले. १९-१-१९९७ रोजी ते निवृत्त झाले.
ते निवृत्त झाले असता सर्वसामान्यांच्या हितासाठी चळवळीतून तुरुंगात गेले.
कारखान्यांना ऊस विक्रीसाठी पूर्वी झोन होते. मात्र, शेतकऱ्यांना जिथे भाव मिळेल तिथे ऊस द्यावा, असा निर्णय देशमुखांनी दिला होता.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. मराठवाडा या विचाराला प्रागतिक पाठिंबा देणारा होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ही चळवळ गेली. यामध्ये अन्याय, अत्याचाराविरुद्ध सर्वांत आधी मराठवाड्याने लढा दिला. एक देशी साम्यवादी फळी उभी राहिली. याच रस्त्याने बी. एन. देशमुख यांनी जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयात त्यांचा वेगळाच संच होता. ही सर्व डाव्या विचारांची मंडळी होती. काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यानंतर अनेक पुरोगामी, डाव्या विचारसरणीच्या दिग्गज मंडळींना पराभव पत्कारावा लागला.
गौरवग्रंथ
[संपादन]- देशमुखांचा गौरव करणारे ‘न्यायमूर्ती बी. एन.’ नावाचे पुस्तक आहे. लेखक - भारत गजेंद्रगडकर. (या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत.)