अलमट्टी धरण
अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात असून पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. धरणाचे बांधकाम इ.स. २००५ साली पूर्ण झाले.
अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा २०० टीएमसी, आणि ५१९ मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा १२३ टीएमसी होतो.[१]
धरणावरचा नामफलक
[संपादन]या धरणावर लालबहादूर शास्त्री सागर अशा नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवला आहे. ही अक्षरे महाराष्ट्रातील लोणावळा येथील ऋषिकेश राऊत या डिझाइनरने बनवलेली अाहेत.
जागतिक विक्रम
[संपादन]हा नामफलक जगात सर्वात अधिक भव्य आहे. कॅलिफाेर्नियातील प्रसिद्ध अशा ‘हॉलिवुड’ अक्षरांच्या लांबी (११० मीटर)पेक्षा अलमट्टी धरणावरील अक्षरांची लांबी (११२.७ मीटर) जास्त अाहे. हॉलिवुडची अक्षरे १४ मीटर उंच व ११० मीटर लांब असून त्यांना बनवण्यास एक काेटी ८७ लाख रुपये खर्च अाला हाेता. तर अलमट्टी धरणावर बसवण्यात अालेली अक्षरे ही पाच ते अाठ मीटर उंच व ११२.७ मीटर लांब असून ती बनविण्यासाठी ५० लाख रुपये खर्च अाला अाहे. धरणावरील ही अक्षरे ॲल्युमिनियम व लाेखंडापासून तयार करण्यात आली असून ऊन व पावासत ती खराब न हाेता अधिक काळापर्यंत टिकून राहतील याची खबरदारी घेण्यात अाली अाहे. स्टील व ॲल्युमिनियमच्या फ्रेमच्या सहाय्याने ही अक्षरे धरणावर पक्की करण्यात अाली अाहेत. २५ कामगारांनी चार महिन्यात नामफलकाचा हा प्रकल्प पूर्ण केला असून, चार किलोमीटर अंतरावरून ही नावे व्यवस्थित दिसू शकतात.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]http://www.kbjnl.karnataka.gov.in/ Archived 2019-08-15 at the Wayback Machine.
- ^ "अलमट्टी धरण" (इंग्रजी भाषेत).