Jump to content

विनायक वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनायक व्यंकट वाघ (?? - इ.स. १९५८) हे एक मराठी शिल्पकार होते. त्यांनी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंगचे शिल्प दोन तासात तयार केले. इंग्लंडच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टचे शिल्पकार हॅम्प्टन यांना अशाच शिल्पासाठी चार तास लागले होते. गव्हर्नर जनरलने वाघ यांची स्वतःचे खासगी शिल्पकार म्हणून नेमणूक केली.

वाघ यांनी गिरगाव चौपाटीला इ.स. १९०१ मध्ये वाघ्स फाइन आर्ट स्टुडियो स्थापन केला.

वाघांनी अनेक भारतीयांचे पुतळे बनवले. पुण्यातील भाजी मंडई समोर असलेला मेघडंबरीतील लोकमान्य टिळकांचा पुतळा २२ जुलै १९२४ रोजी उभारण्यात आला.

वाघांचा मुलगा ब्रह्मेश विनायक वाघ व नातू विनय वाघ हे सुद्धा शिल्पकार आहेत.

बनवलेले पुतळे

[संपादन]

विक्रीकर खात्याचा खटला

[संपादन]

वाघ हे पुतळे विकतात परंतु त्या त्यांवर विक्रीकर भरत नाहीत म्हणून त्यांच्यावर खात्याने १३ जानेवारी १९७५ रोजी खटला भरला. बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर वाघ हे कलावंत आहेत, ते फक्त ऑर्डरीनुसार दगडी किंवा ब्राँझचे पुतळे बनवून देतात, पुतळे विकण्याचे त्यांचे दुकान नाही, असे नमूद करून कोर्टाने विक्रीकर खात्याचा दावा फेटाळून लावून खात्याने वाघांना खटल्याचा खर्च द्यावा असा निकाल दिला.[१]