Jump to content

काँटो में फूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉंटों में फूल हे मुन्शी इस्माईल मियां फरोग या लेखकाने भक्त प्रल्हादच्या जीवनावर लिहिलेले उर्दूमिश्रित हिंदी नाटक किर्लोस्कर नाटक मंडळी करीत असे. (पहिला प्रयोग नागपूरला इ.स. १९१७ च्या जूनमध्ये झाला.) त्यावेळी भक्त प्रल्हादची भूमिका रत्‍नू नावाचा एक कोष्ट्याचा पोरगा करीत असे. पुढे हेच नाटक बलवंत संगीत मंडळी करू लागली. या नाटकात पुढे मा. अविनाश या नावाने प्रसिद्ध झालेला बालनट गणू (गणपतराव मोहिते) प्रल्हादाचे काम करी. त्याच्या तोंडी ‘राज ताजकी सारी शोभा, मन बसे मोरी, आन बढी शान बढी’ हे पद खूप लोकप्रिय झाले. ’कॉंटों में फूल’च्या पदांना पं. भास्करबुवा बखले यांनी चाली दिल्या होत्या.

कॉंटों में फूल’ मधील पात्रांची नावे आणि त्या भूमिका करणारे नट असे होते. :-
हिरण्यकश्यपू-चिंतामणराव कोल्हटकर, कयाधू-कृष्णराव कोल्हापुरे, प्रल्हाद-बालनट गणू, एक दुय्यम विनोदी स्त्रीभूमिका-दीनानाथ मंगेशकर.