देवेंद्रनाथ टागोर
Appearance
देवेंद्रनाथ टागोर (१५ मे, इ.स. १८१७: शिलैदाहा, कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत - १९ जानेवारी, इ.स. १९०५: कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत) हे भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.
कौटुंबिक माहिती
[संपादन]देवेंद्रनाथ हे द्वारकानाथ टागोर यांच्या सहा मुलांपैकी एक होते. देवेंद्रनाथ यांच्या मुलांपैकी अनेकांनी स्वतःची ख्याती मिळविली.
- द्विजेंद्रनाथ टागोर हे कवी, संगीतकार आणि विद्वान होते. यांनी बंगालीमध्ये लघुलेखन आणि सांगितिक संज्ञा (म्युझिकल नोट्स) आणल्या.
- सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय नागरी सेवेत रुजू होणारे सर्वप्रथम भारतीय होते.
- हेमेंद्रनाथ टागोर हे योगी आणि ब्रह्मोसमाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.
- ज्योतिंद्रनाथ टागोर हे संगीतकार आणि नाट्यकलावंत होते.
- रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक विजेते कवी होते. यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतिनिकेतनची स्थापना केली.
- सौदामिनी टागोर या लेखिका होत्या.
- स्वर्णकुमारी टागोर या लेखिका, कवियित्री आणि समाजसेविका होत्या.