Jump to content

औषधनिर्माण शास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औषधनिर्माण शास्त्र (इंग्लिश: Pharmaceutics, फार्मास्यूटिक्स) हे औषधांच्या उत्पादनाचे विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासणारे शास्त्र आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून उदयास आली आहे. औषध निर्माणशास्त्रामध्ये प्रामुख्याने रसायनशास्त्राचा अभ्यास असतो. औषधनिर्माण शास्त्र हे नैसार्गिक अथवा रासायनिक घटकांपासुन निर्मिति प्रक्रिया होत सम्पूर्ण नवे औषध निर्माण करण्याचे शास्त्र म्हणजे औषधनिर्माण शास्त्र होय. या प्रक्रियेमध्ये अनेक पायऱ्या असतात. त्यामध्ये नवीन रासायनिक औषध निर्माण (synthesize) करणे, त्याचे वैद्यकीय उपयोग शोधणे, त्याचे दुष्परिणाम शोधणे, त्याची माणसांकरिता योग्य मात्रा (dose) ठरविणे, त्यानंतर त्याचे योग्य त्या औषध प्रकारात रूपांतर करणे , या औषधाचे परीक्षण करणे आणि शेवटी ते प्राण्यांना तसेच माणसांना देऊन त्याचा अभ्यास करणे अशा पायऱ्या असतात.