Jump to content

मुकुंद वझे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बँक अधिकारी होते. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. वझे यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरुवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणण्यासाठी अशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरुवात केली.

मुकुंद वझे यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या. महाराष्‍ट्र टाइम्‍स आणि लोकसत्ता या दैनिकांमधून त्यांचे लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • क्‍लोज्ड सर्किट
  • टिळक ते गांधी मार्गे खाडिलकर
  • शब्‍दसुरांच्‍या पलीकडले
  • शेष काही राहिले
  • प्रवासवर्णनांचा प्रवास
  • अशी पुस्तके होती
  • ज्याच्या हाती फासाची दोरी ( अनुवादित)
  • राजमोहनची बायको (अनुवादित - मूळ लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी )
  • गुलामगिरीतून गौरवाकडे ( अनुवादित- मूळ लेखक बुकर टी वॉशिंग्टन )
  • बिहाइंड द सीन्स ( अनुवादित - मूळ लेखिका एलिझाबेथ केकली )
  • कोर्नेलियाची कहाणी ( हिंदुस्तानातील पहिली महिला बॅरिस्टर कोर्नेलिया सोराबजी हिचे चरित्र)
  • द हॅपीएस्ट मॅन ऑन द अर्थ ( अनुवादित - मूळ लेखक एडी जॅकू )
  • द स्टोरीज आय मस्ट टेल -(अनुवादित . मूळ लेखक कबीर बेदी )