Jump to content

चर्चा:जुवे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात जुवे हे बेट असल्याचा काहीच उल्लेख नाही.

सेंट इस्तेवम (St Estevam- किंवा जुवें-Juvem) याचे जुने नाव शेकेचो जुवो असे होते. हे मांडवी नदीमधले एक बेट आहे. गोव्याच्या मुख्य भूमीला हे इ.स. १९८०मध्ये एका पुलाने जोडले गेले.

मुळात जुआ, तोल्तो, आणि वाणत्सो या तीन बेटांच्या एकत्रीकरणातून हे जुवें बेट तयार झाले. या बेटावर सात-धारी, फिकट हिरव्या रंगाच्या लांब भेंड्या पिकतात. त्या गोव्यात खूप प्रसिद्ध आहेत. ... (चर्चा) १८:०९, २ एप्रिल २०१६ (IST)[reply]

या लेखाचा विकास सुरु आहे. आपण दिलेली माहिती महत्वाची आहे. शाकाची जुवे हे बेटच आहे. शाक म्हणजे कोंकणीत भाजीपाला. येथे खूप चवदार भाजी पिकते. येथे माझा कामाच्या निमित्ताने संपर्क आहे. फादर बिस्मार्क हा पर्यावरणाचे लढे देणारा धाडसी कार्यकर्ता इथलाच. त्याच्याविषयी लेखात लिहायचे आहे. त्याचे नोव्हेंबर मध्ये अपघाती निधन झाले. त्याचा निर्दयपणे खून करण्यात आला यावर गोव्यात बहुतेक लोकांचा विश्वास आहे. अधिक माहितीसाठी पहा - All news coverage compiled - http://indianewsnetwork.in/click-here-to-sign-campaign-demanding-official-apology-from-goa-cm-parsekar-for-detaining-women-and-senior-citizens/
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१७, ३ एप्रिल २०१६ (IST)[reply]