Jump to content

ज्येष्ठांचे साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे शहरात ३० नोव्हेंबर २०१५ रोजी एक ज्येष्ठांचे साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. नागनाथ कोतापल्ले होते.

पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "ज्येष्ठ नागरिक हे व्यासंगी असतात. म्हणूनच त्यांच्याकडील अनुभवाचा व माहितीचा साठा त्यांनी विकिपीडियासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टाकल्यास नव्या पिढ़ीला त्याचा चांगला फायदा होईल. "

या ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीनशेहून अधिक ज्येष्ठांचा सहभाग होता. व्याख्याने, परिसंवाद, काव्य संमेलन आदींत नामवंत साहित्यिक व कवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता.

  • ४थे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन : पुणे. दिनाखक - ११ फेब्रुवारी २०१९. आयोजक - मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (पुणे)


पहा : साहित्य संमेलने