नागद नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो या डोगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळ्यात आटतात, पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यांतील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळ्यात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या