Jump to content

चर्चा:पेद्रो मोक्तेसुमा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉन पेद्रो (दे) मोक्तेसुमा त्लाकावेपान इवालिकावाका हा अस्तेक सम्राट दुसरा मोतेक्सुमा आणि तोलानचा राज्यकर्ता - इश्त्लिल्क्वेकावाकात्सिनची मुलगी मारिया मियावाशोच्त्सिन, ह्या उभयतांचा मुलगा होता.

दियेगो लुइस मोक्तेसुमा (इवित्ल तेमोक)ची मुले, काउंट आणि नंतरचे मोक्तेझुमा दे तुल्तेन्गोचे ड्यूक बनली. ते पेद्रो त्लाकावेपानकडून दुसर्‍या मोक्तेसुमाचे वंजश लागतात. हे ड्यूकनंतर<<<<हे "ड्यूक नंतर" असून "ड्यूकनंतर" नाही. म्हणजे येथे नंतर हा शब्द ह्या पुढे, ह्या नंतर ह्या अर्थाने वापरलाय. आणि कर्ता ड्यूक असून ते पुढे स्पेनला गेले असे लिहावयाचे आहे. जर काही शुद्धलेखनात चूक असेल तर त्याप्रमाणे दुरुस्त करावे...>>>> स्पेनला जाऊन स्थिरावले. दियेगो लुइसचा मुलगा, म्हणजेच पेद्रोचा नातू - पेद्रो तेसिफोन दे मोक्तेसुमा वाय दे ला क्युएवा ह्याने १९२७ मध्ये स्पेनचा चौथा फिलीप ह्याच्या मदतीने "काउंट ऑफ मोक्तेसुमा" ही पदवी मिळवली. <<<<येथे संपादली असा शब्दप्रयोग केला होता. मुळात त्यांनी ही पदवी मिळवली नाही तर राजाच्या मदतीने असी पदवी तयार करून मग धारण केली. परत शुद्धकेखनाच्या दृष्टीने काही चुका असतील तर योग्य बदल करावे.>>>>

आपले आक्षेप योग्य

[संपादन]

आपले आक्षेप योग्य आहेत. ड्यूकनंतर/ड्यूक नंतर ह्या शब्दांऐवजी तिथे ‘हे ड्यू्क,(स्वल्पविराम आवश्यक!) त्यानंतर स्पेनला गेले’ असे केले की चुकीचा अर्थ होणार नाही.

दुसरे असे की कर्तरी प्रयोगात वाक्यात अनेक कर्ते असले की क्रियापद हे शेवटच्या कर्त्याप्रमाणे चालते. त्यामुळे मुले, काउंट आणि नंतरचे मोक्तेझुमा दे तुल्तेन्गोचे ड्यूक बनले. मुले हा शब्द शेवटी आला असता तर ‘मुले तुल्तेंगोचीं ड्यूक बनली’ असे झाले असते.. (उदा० ती बाई देशाच्या राष्ट्रपती झाल्या.)

इंग्रजीत k किंवा g च्या आधी अनुस्वार आल्यास अनुस्वाराचा उच्चार ङ्‌ (ɳ) असा होतो. स्पॅनिशमध्ये काय होते ते माहीत नाही. त्यामुळे तुल्तेन्गो की तुल्तेंगो/तुल्तेङ्गो?...J ०५:४७, २२ जून २०११ (UTC)

मिळवली ला संपादली हा पर्याय वापरण्यापेक्षा पैदा केली, हस्तगत केली, पदवीचा लाभ उठवला, हिसकावून घेतली वगैरे (विशेषतः पहिले दोन पर्याय) अधिक योग्य ठरतील.

धन्यवाद. आपण नेहमी शुद्धलेखनाबाबतीत उत्तम हातभार लावता. अशीच मदत मिळत राहो... (कमीतकमी माझ्याकडून चूका होत नाही तोपर्यंत!!!... :))
अनिरुद्ध परांजपे ०५:५९, २२ जून २०११ (UTC)