चर्चा:दूध
दूध
[संपादन]Header Line(Definition) लॅक्टोस, प्रथिने, स्निग्ध व इतर काही पदार्थांच्या मिश्रणाने बनलेल्या अपारदर्शी द्रवाला दुध असे संबोधले जाते. दूध हे सस्तन प्राण्यांच्या मादीच्या शरीरातील दुग्धग्रंथीद्वारे तयार होते. स्तनपानाद्वारे नवजातांचे पोषण हे दूधाच्या उत्पादनाचे मुख्य उद्दिष्ट असते. अर्भकावस्थेतून बाहेर पडल्यावर प्राणी मातेच्या दूधाचे सेवन थांबवितात.
माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान
[संपादन]जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्याखालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडिअर, झेब्रा याप्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून दही, लोणी, चीझ, क्रिम, योगर्ट, आईसक्रिम आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
दूधावरील प्रक्रिया
[संपादन]पाश्चरायझेशन व होमोनायझेशन
पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दुध ठराविक काळासाठी ठराविक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून, एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.
दूधाबाबतीत इंटरेंस्टिंग फॅक्ट्स.
[संपादन]देवमासा(Blue Whale) याच्या दुधात सर्वात जास्त स्निग्धांश(Fat) असून घोडा व गाढव यांच्या दूधात ते सर्वात कमी असतात. दूध हि संज्ञा अप्राणीज पदार्थांनासुधा वापरली जाते. जसे नारळाचे दूध. मनुष्यप्राणी हा असा एकमेव प्राणी आहे जो बाल्याअवस्थेतून बाहेर पड्ल्यावरही मातेच्या दूधाव्यतीरिक्त इतर प्राण्यांच्या दूधाचे सेवन करतो.
This is the article prepared by me for submission it is heavily based on English Wikipedia Article and Ref Websites of the same though total composition is done by me. Intially I didn't knew this article exits since there is no link from English Article. I just added the additional information insted of complete replace of existing one I hope these points will help expanding the article. As I'll be moving to the remaining undone articles . --Rio २३:४४, २१ मे २००८ (UTC)