चर्चा:के. कामराज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी ’के.कामराज’मध्यल्या सगळ्या चुका दुरुस्त केल्या होत्या. Abhijitsathe यांनी संपादन उलटवून त्या परत प्रस्थापित केल्या. असे का?

मी सुधारून टंकलेले आणि Abhijitsathe यांनी बदलून पूर्ववत केलेले शब्द असे :

  • त्यांनी ’सांभाळणार्‍या’ बदलून ’सांभाळणाऱ्या’ केले. (ऱ्‌या हे अक्षर मराठीत नाही, सबब बदल अनुचित!)
  • त्यांनी ’नेतेपद सांभाळले.’ बदलून ’नेतेपद देखील पाहिले.’ केले. (नेतेपद ’सांभाळतात’ ’पाहत’ नाहीत. सबब बदल अनुचित!)
  • त्यांनी भारतरत्‍न बदलून भारतरत्न केले. (’त्न” असा लिहिला की वाचता येते नाही, म्हणू ’त्‍न’ लिहायची प्रथा आहे. सबब बदल अनुचित!)
  • त्यांनी ’आदराप्रीत्यर्थ’ बदलून ’आदराप्रिथ्यर्थ’ केले. (’आदराप्रिथ्यर्थ’ असे लिहिणे निव्वळ अशुद्ध आहे, ’आदराप्रीत्यर्थ’ हे योग्य लिखाण. सबब बदल अनुचिता!)
  • त्यांनी अंतर्देशीय’’ बदलून ’आंतरराष्ट्रीयच्या आंतर्देेशीय’ केले.(आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ’आंतर्देेशीय’ म्हणजे काय? (ही दोनही विमानतळे जागेच्या अडचणीमुळी शेजारी शेजारी असली तरी ती स्वतंत्र समजली जातात. त्यातला एक दुसर्‍याचा हिस्सा नसतो. सबब बदल अनुचित!) ... (चर्चा) १६:२७, २२ जून २०१५ (IST)[reply]
Sorry, by mistake. Corrected. - अभिजीत साठे (चर्चा) १६:३५, २२ जून २०१५ (IST)[reply]
परंतु, Domestic terminal हा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे. तो स्वतंत्र विमानतळ समजला जात नाही. येथे पहावे: en:Chennai International Airport.

The international and the domestic terminals cover an area of 1.5 km2 and 1.8 km2, respectively" या वाक्यावरून समजते की डोमेस्टिक टर्मिनल आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनल जवळजवळ असले तरी, त्यातील एक दुसर्‍याचा भाग नाही. इंग्रजी विकिवरील त्या लेखात डोमेस्टिक टर्मिनलच्या फोटोखालील दिलेले कॅप्शन अर्थात चुकीचे आहे.... (चर्चा) २३:२६, २२ जून २०१५ (IST)[reply]

अहो ज, एका विमानतळामध्ये अनेक टर्मिनल्स असतात ना? मग ते वेगवेगळे असले तरी वेगळे विमानतळ होत नाहीत. डॉमेस्टिक एअरपोर्ट असे लिहिले असते तर् तुमचा मुद्दा बरोबर होता. कामराज टर्मिनल हा चेन्नई विमानतळाचाच भाग आहे ह्यात कोणतीही शंका नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ०८:४०, २३ जून २०१५ (IST)[reply]