चर्चा:सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक
स्थानांतराबाबत
[संपादन]या लेखाच्या नावाबाबत/स्थानांतराबाबत सदस्य:अभय नातू यांना गैरसमज झालेला दिसतोय. या पुस्तकाचे नाव सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक असे आहे. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर ते तसेच छापले आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या संपादकांनी ते सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असे केले. दोन्ही प्रकारे पुस्तक हा शब्द त्या पुस्तकाच्या नावातच आहे. लेख पहिल्यांदा प्रकाशीत करतांना मी सारांशामध्ये पुस्तकाचे नाव महात्मा फुले समग्र वाङ्मयात दिल्याप्रमाणे दिले आहे असा उल्लेख केला आहे, तो अभय यांच्या नजरेतून सुटला असावा. येथे पुस्तक कंसामध्ये टाकण्यात काहीच हशील नाही, टाकायचेच असेल तर सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक (पुस्तक) असे होईल (तसे करावे असे माझे मत नाही)! तर Being Bold, मी हे स्थलांतर उलटवत आहे. पुढील मते इथेच मांडावीत. गणेश धामोडकर (चर्चा) १६:५१, २९ डिसेंबर २०११ (UTC)
- मला वरील माहिती नव्हती. योग्य ते स्थलांतर केल्याबद्दल धन्यवाद आणि त्याचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल अधिकच!
- अभय नातू १७:०८, २९ डिसेंबर २०११ (UTC)
- मूळ पुस्तकाचे नाव सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक असे आहे की सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असे आहे (म्हणजे 'धर्म' व 'पुस्तक' हे शब्द जोडून सामासिक शब्द लिहिला आहे, की शब्द अलग लिहिले आहेत) ? पुस्तकाच्या मूळ शीर्षकानुसार लेखाचे शीर्षक असावे, अशी अपेक्षा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:५२, ३० डिसेंबर २०११ (UTC)
- मूळ पुस्तकाच्या मुखपॄष्ठाचे चित्र टाकले आहे, त्याप्रमाणे करायला हवे. गणेश धामोडकर (चर्चा) ०३:४९, ३१ डिसेंबर २०११ (UTC)