चर्चा:कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
खालील मजकूर या चर्चापानावर न येता, शुद्धलेखनाच्या किंवा मराठी लेखनपद्धतीच्या एखाद्या लेखात यावयास हवा होता.
"अनुस्वाराच्या टिंब या चिह्नाचे विविध उपयोग :
- खणखणीत उच्चाराच्या नासिक्य उच्चारासाठी अनुस्वार वापरावा. उदा० चिंच, आंबट, इंच, बँक, वगैरे.
- अस्पष्ट अनुनासिक उच्चारासाठीसुद्धा अनुस्वार वापरावा. उदा० हंहं !, क्यँ क्यँ, अं?, टपाल हंशील, वगैरे.
- हाऊंस या उच्चाराचा शब्द हंस असा लिहावा.
- संइयम् अशा उच्चाराचा शब्द संयम असा लिहावा.
- सौंवर्धन या उच्चाराचा शब्द संवर्धन असा लिहावा, तर सौंरक्षण या उच्चाराचा संरक्षण असा.
- संव्लग्न या उच्चाराचा शब्द संलग्न असा लिहावा, सौंहिता उच्चार हवा असल्यास संहिता लिहा.
- पॅन्ट हा शब्द पँट असा, आणि फ्रेन्च हा शब्द फ्रेंच असा लिहिला तरी चालतो.
आणि सरतेशेवटी, नपुंसकलिंगी शब्दांच्या अंती येणाऱ्या ’ए’काराच्या मात्रेऐवजी अनुस्वार द्यावा. या अनुस्वाराचा उच्चार दीर्घच नव्हे तर उंच जाणाऱ्या ’अ’कारासारखा करावा. गावं या शब्दाचा उच्चार नुसता गावऽ असा होत नाही तर, गावऽ↑ असा होतो. हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते. (ज्याप्रमाणे, वाडा या शब्दातल्या ’डा’साठी जीभ खाली असते तर डावा या शब्दात वरती., त्याप्रमाणे!)....J (चर्चा) १५:५६, ६ सप्टेंबर २०१३ (IST)
अनुस्वार चिन्हाचे (१९६२च्या नियमांनी बाद झालेले) आणखी उपयोग : -
- शब्द लिंग नपुंसकलिंगी आहे ते स्पष्ट करण्यासाठी. तें=It; ते=They; ती=She; तीं=They'Those(neuter gender), उदा० तीं माणसें गेलीं.
- एखादा शब्द अव्यय आहे की नाही ते ओळखण्यासाठी. तो हळूबाई आहे, आणि तो हळूं चालतो. असेच जेव्हां, कां, कीं.
- प्रथमपुरुषी क्रियापदाच्या अंत्याक्षरावर आणि द्वितीय पुरुषी अनेकवचनी क्रियापदाच्या अंत्याक्षरावर. मीं गेलों, आम्हीं गेलों, तुम्हीं गेलां. उदा० कल्पवृक्ष कन्येसाठी लावूंनिया बाबा गेलां. ’गेलां’तल्या ’ला’वर अनुस्वार नसेल तर, बाबा म्हणजे दीनानाथ मंगेशकरांऐवजी मेहेरबाबा किंवा आसाराम बाबा (वगैरे) होईल.
- ’आ’काराने सुरू होणाऱ्या कांहीं शब्दांतल्या ’आ’कारावर - तांतडी, कांकडी(इंग्रजीत ककुंबर), चांचणी वगैरे
- व्युत्पत्तीनें सिद्ध होणारे अनुस्वार. मूळ संस्कृत शब्दात नासिक्य वर्ण असेल तर मराठी शब्दात अनुस्वार येतो. नाम मध्ये ’म’ आहे, म्हणून नांव मध्ये ’ना’वर अनुस्वार. पंच->पांच; ग्राम->गांव (इंग्रजीत Gaon); सीमा->शींव (इंग्रजीत Sion); कोंकण->Konkan; गोधूम->गहूं
- गोव्यातलीं गांवे - पणजीं->Punjim; केपें->Quepem; दाभोळीं->Dabolim; तसेच पेडणें->Pernem, सांखळीं->Sanquelim, वगैरे.
- अनेकवचनीं रूपें दाखवताना. उदा० आम्हांला, वाघांस, कवींहून, वेदांत (अनेक वेदांत), देहांत (अनेक शरीरांत) वगैरे.
- तृतीयेचें रूप दाखवताना. मी करतें, पण मीं केलें. यांतले’मीं’ हे तृतीयेचे रूप आहे, त्यामुळेच याच अर्थाच्या ’म्यां’वर अनुस्वार येतो. तृतीयेचे प्रत्यय नें, नीं, एं, शीं.
- सप्तमीच्या रूपांतही अनुस्वार असतो. अंतीं, ठायीं वगैरे.
..... J (चर्चा) १७:४८, ६ सप्टेंबर २०१३ (IST)"
>>हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते.<< (संस्कृतमधील 'तालव्य' असे शब्द)?--वि. नरसीकर २०:३९, १२ डिसेंबर २०१३ (IST)
ज्ञानकोशीय लेखनशैली अनुरूपता समसमीक्षण
[संपादन]या लेखास {{पुनर्लेखन}} साचा आणि [ दुजोरा हवा] साचा सदस्य:Prabodh1987 यांनी लावला होता. सदस्य:Prabodh1987 यांचा साचे लावतानाचा नेमका दृष्टीकोण ते स्वत: अधिक व्यवस्थीत सांगू शकतील.मी माझे समसमीक्षण देतो आहे.
लेख ज्ञानकोशीय लेखनशैलीच्या बऱ्यापैकी जुळणारा असला तरी वर्णनात्मकता/कथाकथन शैली अंशत: शिल्लक आहे असे वाटते;मुख्य कारण लेखविषयाशी संबंधीत व्यक्ती संस्थांबद्दलची माहिती त्या त्या लेखात जावयास हवी त्याची अनावश्यक सरमिसळ होते आहे.विकिपीडियाच्या शैलीस अनुसरून प्रत्येक ओळीत संदर्भ दिले गेल्यास लेखास चांगल्या ज्ञानकोशीय लेखाचे स्वरूप प्राप्त होऊ शके असे वाटते.
अनुक्रम | मजकूर | समीक्षा | अधिक टिपणी |
---|---|---|---|
१ | कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत, संस्कृतविद्या, आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक, आणि संशोधक. वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन. | पहिल्या वाक्यात क्रियापदाच्या अभावाने पुर्णविराम असूनही अपेक्षीत परिणाम साधत नाही,क्रियापदाच्या अभावाने वाचन सुलभता कमी होत नाहीना हे पुन्हा अभ्यासावे. | संस्कृत, संस्कृतविद्या, यात संस्कृत शब्दाची होणारी पुनरावृत्ती टाळणे शक्य असल्यास वाचन सुलभता वाढू शकते असे वाटते.अभ्यासक हा शब्द पुरेसा व्यापक आहे सोबतीस व्यासंगी हे विशेषण आहे, तरीसुद्धा संशोधक शब्द तीच वस्तुस्थिती पुन्हा ठसवतो आहे का ? * "कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक,लेखक आणि अध्यापक होते.त्यांनी वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत विपुल लेखन केले." वाक्य रचना काहीशी अशी बदलता येईल का |
२ | कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे). संस्कृत, संस्कृतविद्या, आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक, आणि संशोधक. वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन. | या ओळींचे लेखन करणाऱ्या लेखक संपादकाचा, क्रियापदाच्या अभावाचा एक उद्देश वाचकाच्या मनात महत्ता निर्मीतीच्या उद्देशाने वाचकाचे मत बनवणे/प्रभावित करणे नाहीना? अशी साशंकता वाटते. | हे तपासण्यासाठी परिचयवाचक क्रियापद विहीन वाक्यांच्या अधिक अभ्यासाची आवश्यकता वाटते |
३ | जीवन: उमेदवारीचा काळ | विभाग शीर्षक वेगळ्या पद्धतीने लिहिणे शक्य आहे का शिवाय विभाग उपविभागात वाटणे शक्य व्हावे असे वाटते | उदाहरण |
४ | वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी पुण्यात विष्णुशास्त्री बापट यांनी सुरू केलेल्या आचार्यकुलात तीन वर्षे राहून कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजकसभेची परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी (दंडीच्या काव्यादर्शावरचा सटीक ग्रंथ श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट उडी मारता आली. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक नी.वा. तथा बापूसाहेब किंकर यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठीची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी अरविंद गंगाधर मंगरूळकर यांनी करून घेतली होती. | *वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर (वाक्याची सुरवात आणि वाक्याच्या लांबी अभ्यासून पुनर्लेखनास वाव आहे का ते पहावे असे वाटते *आधुनिक शिक्षणव्यवस्थेत *अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट * |
उदाहरण |
उदाहरण | पुढील काळात सं-म-त अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ विश्वनाथ आबाजी खैरे, १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ अरविंद लोणकर, कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक सखाराम हरी देशपांडे, संस्कृतज्ञ आणि मराठी कवी वसंत संतू पाटील हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र. | "भाषातज्ञ विश्वनाथ आबाजी खैरे, त्वचारोगतज्ञ अरविंद लोणकर ,लेखक सखाराम हरी देशपांडे संस्कृतज्ञ आणि मराठी कवी वसंत संतू पाटील हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र." एवढे वाक्य पुरेसे आहे;संशोधन लेखनावर प्रत्यक्ष प्रभाव नसलेली, त्या त्या व्यक्तींबद्दलची अधीकची माहिती त्या त्या संबंधीत लेखात जावयास हवी. | उदाहरण |
उदाहरण | पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी स्वत:च्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण त्यांना वडील बंधू विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर यांच्याकडून मिळाले. | जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, या वाक्यांशाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असणारच नाही असे नाही पण तशी ती खरेच आहे का आणि नेमकी किती हे पुन्हा अभ्यासण्यास वाव आहे असे वाटते | उदाहरण |
उदाहरण | (हे काम आता राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (National Mission for Manuscripts)-च्या कामाचा भाग म्हणून चालू आहे.) | हे वाक्य आनंदाश्रम संस्था या लेखात जावयास हवे | उदाहरण |
उदाहरण | लीला देव यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. लीला अर्जुनवाडकर यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. | या वाक्यास दुजोरा हवा साचा लावला गेला होता तो कोणताही संदर्भ न देता परस्पर वगळला गेलेला दिसतो ,"म्हणून प्रसिद्ध" ह्या दोन शब्दांची ज्ञानकोशात आवश्यकता आहे असे वाटत नाही. | उदाहरण |
उदाहरण | संस्कृतेन अभिनन्दत, अभिवादयत -- Wish/Greet in Sanskrit | हा विभाग इंग्रजी आणि इतरभाषी विकिबुक्स मध्ये संदर्भासहीत स्थानांतरीत करावयास हवा | उदाहरण |
उदाहरण | मराठीतल्या पदान्तीच्या दीर्घ अकाराचे लेखन | कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांची मते ही कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांची आहेत.त्याची संदर्भासहीत ज्ञानकोशीय दखल विकिपीडियात घेणे योग्य आहे.इतरांनी केलेले प्रतिवाद आणि टिकाही संदर्भासहीत नोंदवावयास हव्यात. पण मराठी विकिपीडियाच्या संपादकांनी चर्चापानावर अर्जुनवाडकरांच्या मताच्या केलेला प्रतिवादाचा,संबधीत विभागातील उल्लेख अप्रस्तुत व्यक्तीगत मत म्हणून अनुल्लेखनीय ठरतो. *विभागात विकिपीडिया शैलीने ओळीत संदर्भ देण्याची पद्धत वापरून पुनर्लेखन शक्य व्हावे असे वाटते. *संबंधीत लेखन पद्धतीचे छायाचीत्र लेखात जोडावयास वाव आहे. |
उदाहरण |
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१३, १२ डिसेंबर २०१३ (IST)
>>हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते.<< (संस्कृतमधील 'तालव्य' असे शब्द)?--वि. नरसीकर २०:३९, १२ डिसेंबर २०१३ (IST)
हिंदीमध्ये क. ख. ग. फ, ड, आणि ढ ही अक्षरे काही शब्दांमध्ये क़, ख़, ग़, ड़ आणि ढ़ अशी वेगळी लिहिली जातात, आणि वेगळी उच्चारलीही जातात. मराठीतही च़ छ़ ज़ झ़ ञ़ या दंत्यतालव्य अक्षरांचे उच्चार आणि फ़ या दंत्योष्ट्य अक्षराचा उच्चार च छ ज झ ञ या तालव्य अक्षरांच्या उच्चारापेक्षा वेगळे आणि फ या ओष्ट्य अक्षराच्या उच्चारापेक्षा वेगळा असतो हे मान्य करायला कुणाचीच, हरकत नसावी. उदा० च़मचा़, वच़्छ़ (वत्स या संस्कृत शब्दाचा मराठी उच्चार), झा़डू, ज़रासा, फ़ारसा या शब्दांचे उच्चार.
मराठी ’ड’चे दोन उच्चार आहेत, हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. शब्दारंभी येणारा ’ड’ आणि शब्दात पुढे येणारा ’ड’ यांचे उच्चार मराठी माणूस वेगवेगळे करतो. उदाहरणार्थ डावा आणि वाडा़ या शब्दांत्यले ’डा’ यांचे उच्चार भिन्न आहेत. हिंदीत हे नुक्त्याने दाखवतात, मराठीत दाखवत नाहीत इतकेच (हिंदीत डमडम परंतु खड़की, डबा परंतु बाड़, डाक परंतु कडा़, डाटना परंतु गाड़ना, वगैरे. हिंदीतल्या ’ड’चे हे उच्चार वेगवेगळे लिहून दाखवतात, मराठीत नाहीत, एवढेच...J (चर्चा) २३:१४, १२ डिसेंबर २०१३ (IST)