चर्चा:दारणा धरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दारणा धरण हे नांदगाव ह्या ठिकाणी आहे. परंतु हे तालुक्याचे गाव नाही. नांदगाव नावाचा एक तालुका नाशिक जिल्ह्यात आहे.

-उपरोक्त सही नसलेले लेखन सदस्य:Salveramprasad यांचे आहे.

दारणा धरण असलेल्या गावाचे नाव बहुधा "नांदगाव सदो" असे असावे ?[ दुजोरा हवा]
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२९, ५ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]
  • इगतपुरी तालुक्यात नांदगाव सदो नावाचे गाव आहे पण त्या ठिकाणी दारणा धरण नक्कीच नाही. दारणा धरण असलेले गाव "'नांदगाव बु ||'" असे आहे. त्या बाबत मी खात्री केलेली आहे. साळवे रामप्रसाद १३:०३, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)

ता.क.- नांदगाव बुद्रुक नावाचे गाव निफाड,मालेगाव व महाड तालुक्यात पण आहे.साळवे रामप्रसाद १३:०७, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)


धन्यवाद, मला वाटते नांदगाव नावाची बरीच गावे (भारतभर) आहेत (केवळ nand (नंद/नांद) पासून शोध घेतल्यास संख्या शेकड्यात जाण्याची शक्यता दिसते),पोस्टखात्याच्या पिनकोड शोधात बरेच नांद गाव येत आहेत. नांदगाव (नि:संदिग्धीकरण) येथे सर्व नांदगावांची नोंद करून घेतलेली बरी पडेल म्हणजे गल्लत होण्याचा संभव कमी असेल असे वाटते.
इगतपुरी तालुक्यात सुद्धा एकपेक्षा अधिक नांदगाव बुद्रुक नसतील याचाही शोध घ्यावा लागेल. माझ्याकडे अजून एक ऑनलाईन माहिती स्रोत होता विसरलोय शोधतो आहे.
सेन्सस कोडचा शोध घेतला केवळ महाराष्ट्रातच ७२ नांदगाव मिळाले. नांदगाव बुद्रुक तालुका इगतपुरीचा सेन्सस व्हीलेज कोड 551061 हा आहे. इगतपुरी तालूक्यात हे एकटेच नांदगाव बुद्रुक आहे असे दिसते. आपण म्हणता तसे नांदगाव सदो हे गाव वेगळे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४२, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]
  • धन्यवाद सर साळवे रामप्रसाद ०८:५०, ७ नोव्हेंबर २०१३ (IST)