निअर्कस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निअर्कस (इ.स.पू. ३६० - इ.स.पू. ३००) हा अलेक्झांडर द ग्रेटचा मित्र होता. अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीनंतर हा मॅसिडोनियन सैन्य घेउन सिंधु नदीतून इराणच्या आखातामार्गे परत गेला. अलेक्झांडरने याला लिसिया आणि पॅम्फेलिया या सध्याच्या तुर्कस्तानातील प्रदेशांवर राज्यपाल नेमला होता.