श्रीकांत उमरीकर
Appearance
श्रीकांत अनंत उमरीकर (जन्म : ६ जानेवारी १९७१) हे एक मराठी कवी व लेखक आहेत. ते बी.ई. असून व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत.
शिवाय
[संपादन]- श्रीकांत उमरीकर हे ’ग्रंथसखा’ या मासिकाचे संपादक आहेत.
- ते ’शेतकरी संघटक’ या पाक्षिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
- ते जनशक्ती ज्ञान अकादमीचे सचिव आहेत. ही संस्था एक प्राथमिक मराठी शाळा चालविते.
- याच संस्थेच्या ’जनशक्ती बुक्स अँड पब्लिकेशन’ या प्रकाशन संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.
- श्रीकांत उमरीकर हे ’जनशक्ती वाचक चळवळी’चेही संचालक आहेत.
- ते शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटना या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. संस्थेच्या ई-नियतकालिकात त्यांचे लेख छापून येत असतात.
- श्रीकांत उमरीकर यांचे साहित्यविषक लेखन मराठी दैनिकांमध्ये छापून येत असते.
श्रीकांत उमरीकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- दोन शब्दांमध्ये (कवितासंग्रह)
- समग्र बी.रघुनाथ खंड : भाग १, २, ३. (संपादित)
- बी.रघुनाथ यांचे वाङ्मय - एक परिसंवाद (संपादित)
- समग्र डॉ. ना. गो. नांदापूरकर : खंड १, २ (संपादित)
उमरीकर यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (१९९५)
- लोकमत युवा साहित्यिक पुरस्कार (१९९२)