Jump to content

वरदराजन चारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरदराजन चारी हे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अ‍ॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.[] त्यांनी १९७४ मध्ये आय.आय.टी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक ही पदवी मिळवली.त्यानंतर ते १९७६ पर्यंत मुंबईत युनियन कार्बाईड कंपनीत नोकरीला होते.त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. १९८० मध्ये त्यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पी.एच.डी ही पदवी संपादन केली.त्यानंतर ते १९८० मध्ये शिकागोमधील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्टमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.१९८६ ते १९९२ या काळात ते फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ मिन्निअ‍ॅपोलिस मध्ये अर्थतज्ञ म्हणून होते.त्यानंतर १९९४ पासून ते युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अ‍ॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2014-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-31 रोजी पाहिले.