स्वतःमधील विसर्ग चिन्ह हे त्या अक्षराचा भाग आहे. :वर्ग: इथे कोलन वापरले आहे. इथे र्ग आणि : वेगवेगळे कॉपी पेस्ट करता येतील. कारण येथे वर्ग शब्दाचे लेखन संपले असता मराठी फाँट बंद केला आणि कोलन : नंतर केवळ इंग्रजी फाँट चालू असताना टाईप केला आहे.
खालील अक्षरे कशी लिहावीत याची कल्पना नसल्याने बर्याचदा शुद्धलेखन त्रुटी उद्भवतात. अकारांत शब्दातील शेवटच्या अक्षरानंतर a टाईप करण्याचे राहील्यास हेच वाक्य अकारांत् शब्दातील् शेवटच्या अक्षरानंतर्a टाईप् करण्याचे राहील्यास् असे दिसते. खास करून तुम्ही नवीन तयार केलेल्या लेख नावात अशी चूक नजर चूकीने झाली तर काही वेळेस लगेच लक्षात न येऊन आपला लिहिलेला लेख शोधण्यात विनाकारण वेळ जातो.
१) ओ कार लिहिताना केवळ o पूरे. हो लिहावयाचे झाल्यास ho . Capital O टाळावा कारण ते कन्नडमधल्या एकारान्त प्रकार-२( जे एकार आणि ओकार मधील मराठी व्याकराणात न स्विकारला जाणारा उच्चार हॊ ) चे देव नागरी रूप आहे. शोध यंत्राकरिता(search) दोन्ही वेगळे आहेत हॊळकर लिहून होळकर लेखावर पोहोचता येणार नाही.
२) असेच जरासे फ चेही आहे ph लिहून फ बनवावा. ( F ने येणारा फ़ टाळावा. हिन्दी आणि ऊर्दू करिताचा टिंब यूक्त (ज्यास 'नुक्ता' म्हणतात)असलेले वेगळे उच्चारण आहे.मराठी करता वस्तुत: फ़ वापरण्याने बिघडण्या सारखे काही नाही, परंतु शोध यंत्रे हिन्दी ला समोर ठेवून बनतात.त्यामुळे कोणास अडचण होउ शकते.