Jump to content

पृष्ठीय क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पृष्ठीय क्षेत्र (लेग/ऑन साईड) हा क्रिकेटच्या मैदानाचा एक विभाग आहे.

खेळपट्टीच्या लांब अक्षाच्या मधोमध काल्पनिक रेषा ओढून क्रिकेट मैदानाचे दोन भाग केले जातात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या संदर्भात, तो फलंदाजीसाठी पवित्रा (स्टान्स) घेऊन उभा असताना, त्याच्या पाठीकडची बाजू, म्हणजेच गोलंदाजाच्या आणि बिन-टोल्या टोकाच्या पंचाच्या उजव्या हाताकडील बाजू, म्हणजे पृष्ठीय क्षेत्र होय.