चर्चा:शब्दगंध साहित्य संमेलन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तम कांबळे हे सांगलीच्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, हे कुठेतरी आंतरजालावर वाचले असल्याची माझ्याकडे नोंद आहे. परंतु १ ते ९ या सर्वच संमेलनांच्या अध्यक्षांची नावे लेखात आल्याने एकतर माझी नोंद चुकीची असेल किंवा लेखात नावे लिहिण्यात काहीतरी चूक झाली असावी. नक्की खातरजमा झाल्याशिवाय तूर्त माझ्याकडून कोणतीही दुरुस्ती(?) होणार नाही....J (चर्चा) २३:२७, ११ जुलै २०१२ (IST)[reply]

सांगलीला शब्दगंध नावानेच दुसरे एखादे साहित्य संमेलन झाले असल्यास माहिती नाही. तसे जर झाले असेल तर तिथे उत्तम कांबळे संमेलनाध्यक्ष असू शकतात. पण शब्दगंध साहित्यिक परिषद (जिचे संस्थापक सुनील गोसावी आहेत जे आज या परिषदेचे सचिव आहेत) जी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलने आयोजित करते ते पहिले संमेलन अहमदनगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित केलेले होते व मी स्वत: या पहिल्या संमेलनासह आजवर झालेल्या सर्व संमेलनांना व्यक्तिश: उपस्थित होतो. त्यामुळे मी नोंदवलेली पहिल्या संमेलनाची माहिती विश्वासार्हच ठरावी (अशी माझी अपेक्षा). शब्दगंध साहित्यिक परिषदेने इ.स. २००८ साली आजचा शब्दगंध नावाने तोपर्यंत झालेल्या संमेलनांवर आधारीत प्रकाशित केलेल्या स्मरणिकेची मुद्रीत प्रत माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यातही मी पहिल्या संमेलनाविषयी नोंदवलेलीच माहिती आहे. त्यामुळे ती माहिती अधिकृत मानण्यास हरकत नसावी.
संतोष दहिवळ (चर्चा) २३:४७, ११ जुलै २०१२ (IST)[reply]
संतोष यांच्या मताशी सहमत.....Mvkulkarni23 २३:३३, १३ जुलै २०१२ (IST)


वर J यांनी चर्चा सुरू करताना मांडलेल्या मतावर मी माझा खुलासा केला होता. J यांनी मांडलेल्या मतावर खुलासा करतेवेळी J यांनी मतात
>>हे कुठेतरी आंतरजालावर वाचले असल्याची माझ्याकडे नोंद आहे.<<
असा उल्लेख होता. J यांनी मांडलेल्या मतावर खुलासा करताना
>>सांगलीला शब्दगंध नावानेच दुसरे एखादे साहित्य संमेलन झाले असल्यास माहिती नाही. तसे जर झाले असेल तर तिथे उत्तम कांबळे संमेलनाध्यक्ष असू शकतात.<<
असे माझे मतही मी मांडले होते परंतु आज पाहिले तर J यांच्या वाक्यातील नोंद या शब्दाला बाह्यदुवा देऊन संदर्भ दिल्याचे दिसले. J यांनीच त्यांच्याकडे असलेल्या नोंदीला संदर्भ दिला असेल असे माझे सुरूवातीला मत झाले होते पण पानाच्या इतिहासात जाऊन पाहिले तर तिथे कुणीतरी त्रयस्थ (या पानावरील चर्चेत बदल करताना वा भाग घेताना या सदस्यांनी कुठेही आपल्या सहिचा ठसा किंवा नावाची नोंद न केल्याने नाईलाजाने त्रयस्थ हा शब्द वापरावा लागत आहे.) सदस्याचे नाव दिसले. (J यांची आणि त्रयस्थाची नोंद एकच असू शकते. (?) किंवा J आणि हे त्रयस्थ सदस्य एकच असू शकतात.) या पानात मी संपादिलेल्या माहितीबाबतीत काहीही शंका असल्यास अगदी अनामिक नावाने पण स्वतंत्रपणे विचारल्यास विश्वासार्ह खुलासा करण्याचा प्रयत्न करीन मराठी विकिपीडियाची विश्वासार्हता हे माझ्या येथील कोणत्याही संपादनाचे पहिले उद्दिष्ट आहे. वर नोंदीत दिलेल्या संदर्भाअनुषंगाने शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या सगळ्या संमेलनाध्यक्षांसंदर्भात विश्वासार्ह खुलासा करीन. पण आज मी माझा वेळ त्यासाठी दवडू शकत नाही. (१६ जुलै पर्यंत इतर कामात व्यस्त असल्याची नोंद इतरत्र केलेली आहे) याबद्दल क्षमस्व. दुसरे असे की शब्दगंध साहित्यिक परिषदेशी मी अत्यंत जवळून निगडीत असल्याने (ते कसे हे मी येथे सार्वजनिक करू इच्छित नाही.) सार्वकालिक सत्य व विश्वासार्ह असा सविस्तर खुलासा पुराव्यानिशी लवकरच करीन.
संतोष दहिवळ (चर्चा) ००:१३, १३ जुलै २०१२ (IST)[reply]
त्रयस्थ सदस्याने J यांच्या चर्चेत ढवळाढवळ करून नोंद या शब्दाला संदर्भ टाकल्यामुळे त्याचा खुलासा म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अधिकृत मुखपत्र खाली देत आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेने आज दिनांक १६ जुलै इ.स. २०१२ अखेर एकूण नऊ शब्दगंध साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. या नऊ संमेलनात कोणत्याही संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे नव्हते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या खाली दिलेल्या मुखपत्रात सर्व संमेलनाध्यक्षांची नावे नमूद आहेत.
-संतोष दहिवळ (चर्चा) २२:५१, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
चित्र:Letterhead of Shabdagandh Sahityk Parishad.jpg
-संतोष दहिवळ (चर्चा) २२:५१, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या खाली दिलेल्या फेब्रुवारी २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत पान क्रमांक ६ वरील तोपर्यंतच्या म्हणजे चौथ्या शब्दगंध साहित्य संमेलनापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची सूची
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:३३, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
चित्र:Page6ShabdgandhaFeb2006.jpg
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:३३, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या खाली दिलेल्या मे २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत पान क्रमांक १७ वरील तोपर्यंतच्या म्हणजे पाचव्या शब्दगंध साहित्य संमेलनापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची सूची
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:३७, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
चित्र:Page17ShabdgandhaMay2007.jpg
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:३७, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या खाली दिलेल्या मे २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत पान क्रमांक ३९ वरील तोपर्यंतच्या म्हणजे सहाव्या शब्दगंध साहित्य संमेलनापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांची सूची
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:४०, १६ जुलै २०१२ (IST)[reply]
चित्र:Page39ShabdgandhaMay2008.jpg
-संतोष दहिवळ (चर्चा) २३:४०, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

काढलेल्या चित्रांऐवजी पुरावा म्हणून[संपादन]

ज्या पद्धतीने पुरावा म्हणून दिलेली चित्रे काढण्यात आली त्याला नवीन पुरावा म्हणून शब्दगंध साहित्यिक परीषदेचे संकेतस्थळ बनविण्यात आले आहे त्याचा दुवा खालीच देत आहे तिथे जाऊन सगळ्या संमेलनाध्यक्षांच्या नावांची खात्री केली जाऊ शकते. आणि हो हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे' अधिकृत संकेतस्थळ आहे (माझे नाही). हा अधिकृत संकेतस्थळाचा दुवा येथून काढून टाकायचा असेल तरी माझी काही हरकत नाही स्वागतच असेल.

तो मी नव्हेच[संपादन]

नोंदीचा दुवा टाकणारा त्रयस्थ मी नाही!...J (चर्चा) ००:०१, २० जुलै २०१२ (IST)[reply]