Jump to content

उंबरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड. हा उंबराच्या खोडापासून बने. उंबऱ्याच्या वरच्या बाजूच्या सपाट पृष्ठभागाला उंबरठा म्हणतात. घरात येणारी नववधू त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या मापातील धान्य पावलाच्या हलक्या धक्क्याने सांडवते आणि घरात प्रवेश करते.

गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत, असे समजले जाई.मराठी रूढी परंपरेप्रमाणे उंबऱ्याला पैशाची नाणी लावतात.

लाकडी दाराच्या चौकटीत वरच्या बाजूस बसविलेल्या जाड रुंद आणि सपाट लाकडाला वरचा उंबरा (Lintel) असे म्हणत.

आणखी अर्थ

[संपादन]
  • उंबर = उमर (वय) - ग्रामीण भाषेत वय या अर्थासाठी वापरात असलेला ऐतिहासिक शब्द
  • उंबर (जमीन) = ओलावा धरून ठेवणारी (जमीन), पाणथळ (जमीन)
  • उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर

उंबऱ्यासंबंधी वाक्प्रचार

[संपादन]
  • उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे
  • उंबर फोडून केंबरे काढणे = स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याला हानी पोहोचवणे
  • उंबरवडा == वाण देण्यासाठी केलेला मध्ये भोक नसलेला वडा (खाद्यपदार्थ)
  • उंबरा ओलांडणे = उंबरा चढणे == घरात प्रवेश करणे
  • उंबरातला किडा = घरकोंबडा, घराबाहेर जाऊन पराक्रम न करणारा
  • उंबरे झिजवणे = विशिष्ट कामासाठी घरांघरांत जाऊन चौकशी करणे
  • उंबऱ्याची साल काढणे = उंबऱ्याला माती राहू न देणे = एखाद्या घराला पुन्हापुन्हा भेट देणे
  • उंबऱ्याचे फूल == क्वचित भेटणारा माणूस
  • भरले पोटां उंबर कडू = पोट भरले असेल गोड पदार्थही कडू लागतो, सर्वच नकोसे वाटते.
  • सोन्याचा उंबरा = समृद्धी