चिकित्सा पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एका रोगावर दिलेले औषध हे दुसऱ्या रोगाचे कारण बनत आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यात वेगवेगळे असे त्यांचे गुण-दोष आहेत. कोणाला कोणती एक पद्धत आवडते तर कोणाला दुसरी. रोग्याला रोगापासून आराम हवा असतो. तो मिळावयास हवा. चिकित्सा पद्धती कोणतीही असो. शक्य तोवर रोगी त्याचे आर्थिक कुवती प्रमाणे चिकित्सापद्धती स्विकारतो असा अनुभव आहे. त्यातही, 'विश्वासः फलदायकः'(Faith is fruitful)विश्वास ठेवणे फलदायी असते. ज्या चिकित्सापद्धतीवर वा चिकित्सकावर रोग्याचा विश्वास नाही, ती चिकित्सा लागू पडत नाही. त्यामुळेच आता बहुतेक रुग्णालयामध्ये 'KEEP FAITH ON YOUR DOCTOR' असे फलक लागलेले आढळतात. जुन्या काळी ही संकल्पना होती ती पुन्हा रुढ होऊ पहात आहे. याचे जास्त फायदे आहेत. जगात सुमारे १२२ चिकित्सापद्धती असतील असा अंदाज आहे. भारतामध्ये विविध चिकिस्या पद्धती आहेत त्यामध्ये आयुर्वेदिक ही सर्वात जुनी व प्राचीन चिकिस्या पद्धती आहेत.