Jump to content

शिक्षक साहित्य संमेलन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९ जानेवारीला २०१२ला दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या दुसऱ्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, अशी संमेलने भविष्यकाळात भरवण्यासाठी, शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि भाषा व साहित्य अध्यापनाच्या आशयसमृद्घीसाठी शिक्षक साहित्य संमेलन या नावाची नवी संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या संस्थेच्या सध्याच्या मानद सचिव असून नीरजा धुळेकर या अध्यक्षा आहेत.