साधना साहित्य संमेलन
Appearance
साधना ट्रस्टतर्फे, दरवर्षी साधना साहित्य संमेलन भरविले जाते. एकाच वाङ्मय प्रकाराला वाहिलेले आणि अध्यक्ष विरहित संमेलन अशी या संमेलनाची ख्याती आहे.
- १ले साधना साहित्य संमेलन ’कादंबरी’ या विषयावर पुणे येथे भरले होते.
- २रे समेलन ’काव्य’ या विषयावर गोव्यात भरले होते.
- ३रे साधना साहित्य संमेलन कोल्हापूर येथे १० ते १२ डिसेंबर २०१० या काळात झाले. हे संमेलन 'साधना ट्रस्ट' आणि 'राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांनी संयुक्तपणे भरवले होते. ह्या संमेलनात 'कथा' या विषयाला केंदस्थानी ठेवून चर्चा, भाषणे झाली. हिंदी कथाकार संजीव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्य बीजभाषण साहित्यसमीक्षक पुष्पा भावे यांनी केले.
- ४थे साधना साहित्य संमेलन ' नाट्य ' या विषयावर नाशिक येथे झाले. दिवस होते १० आणि ११ डिसेंबर २०११. चित्रपट अभिनेता अमोल पालेकर (की उत्तम कांबळे?)यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले आणि संमेलनाचे बीजभाषण नाटककार गो . पु . देशपांडे यांनी केले.
पहा : साहित्य संमेलने