जनार्दन विनायक ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनार्दन विनायक ओक (इ.स. १८९७:पुणे, महाराष्ट्र - २२ एप्रिल, इ.स. १९१८ (चैत्र शुद्ध द्वादशी):पुणे, महाराष्ट्र) हे एक शिक्षक आणि कोशकार होते. [१]

बालपण आणि शिक्षण[संपादन]

जनार्दन विनायक ओक यांचा जन्म व शिक्षण पुणे शहरातच झाले.[१] मॅट्रिक परीक्षेस बसण्यापूर्वीच आधी दोन वर्षे जनार्दन विनायक ओक यांना पहिली संस्कृत स्कॉलरशिप मिळाली.[१] १८९६ साली ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले आणि १८९९ साली बी.ए.ची व १९०१ साली एम.ए.ची परीक्षा ते पास झाले. १९०१ साली एम.ए. झाल्यानंतर जनार्दन विनायक ओक यांनी मुंबईस राहून १९०२ साली पहिल्या एल्एल.बी.ची परीक्षा दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एल्‌‍एल.बी.चा आभ्यास सोडून देऊन विश्रांतीकरिता पुण्यास यावे लागले.[१]

कारकीर्द[संपादन]

जनार्दन हे कृष्णाजी गोविंद ओक यांचे शिष्य होते. [ दुजोरा हवा] डेक्कन एज्युकेशन सोसायटीत (१९०२ ते १९०५ [ दुजोरा हवा]) असताना त्यांना फर्ग्युसन कॉलेजात व न्यू इंग्लिश स्कूलमध्येही काम करावे लागे.[१] १९०६ च्या सप्टेंबर महिन्यात डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हवा पालटण्याकरिता ते नागपुरास जाऊन राहिले. ता.२ जानेवारी १९०७ पासून नाना ओक हे नील सिटी स्कूल (नागपूर)चे सुपरिंटेंडंट झाले. रिस्ले सर्क्युलरच्या अंमलबजावणी बाबत कृष्णाजी गोविंद ओक यांचा मतभेद होऊन त्यांनी वर्षाभरातच तेही काम सोडले.[१] १९०८ साली समर्थ विद्यालय तळेगाव येथे रुजू झाले. सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ अरेरावी करून कोणतेहि कारण न दाखविता आणि कसलीही चौकशी न करिता अधिकाराच्या जोरावर समर्थ विद्यालय बंद केले (वर्ष ?)[१]

संपादन[संपादन]

१९११ साली लोकशिक्षण नावाचे मासिक काढले. १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले .श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली.

संस्कृत भाषेतील ग्रंथांचा मराठीत अर्थ समजून घेऊन ते वाचणाऱ्या वाचकांच्या उपयोगाकरिता त्यांनी 'गीर्वाणलघुकोश' केला.[१] गीर्वाणलघुकोश हा संस्कृृत भाषेतील शब्दांचे मराठी अर्थ सांगणारा कोश आहे.नामकोश,धातुकोश,विषेशनामकोश अशी याची रचना आहे.परिशिष्टात न्याय,अलंकार,वृृत्ते आणि ज्योतिष या विषयीच्या संकल्पनांचे स्पष्टीकरणही नोंदविले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f g h लेखक: जनार्दन सखाराम करंदीकर. "लेखनाव: 'मृत्युलेख' (लोकशिक्षण मासिक)".