Jump to content

"ऑल द प्रेसिडेंट्स मेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५९: ओळ ५९:


== बाह्यदुवे ==
== बाह्यदुवे ==
*[http://www.washingtonpost.com/wp-srv/style/longterm/movies/features/dcmovies/allthepresidentsmen.htm वॉशिंग्टन पोस्टमधील लेख]
*[http://www.iscriptdb.com/PDF/ALL%20THE_PRESIDENT'S_MEN.htm विलियम गोल्डमन यांची पटकथा]




[[वर्ग: ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट]]
[[वर्ग: ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट]]


[[en:All the President's Men (film)]]
[[en:All the President's Men (film)]]
<nowiki>Insert non-formatted text here</nowiki>

१६:४१, ९ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

ऑल द प्रेसिडेंट्स मेन
चित्र:All the presidents men.jpg
दिग्दर्शन ऍलन पाकुला
प्रमुख कलाकार रॉबर्ट रेडफोर्ड,डस्टिन हॉफमन,जेसन रॉबर्ड्स,हॅल होलब्रुक,जेन अलेक्झांडर,मार्टिन बालसाम,जॅक वॉर्डन
छाया गॉर्डन विलीस
संगीत डेव्हीड शायर
देश अमेरिका
भाषा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार



कलाकार

पार्श्वभूमी

१९७२ ते १९७४ ही वर्षे अमेरिकेच्या इतिहासात विशेष ठरावीत. ह्याला कारण होते रिपब्लिकन राजवटीतील वॉटरगेट प्रकरण. १९७२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात घुसल्याच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक झाली. हे पाचही लोक अमेरिकन गुप्तहेर संस्था सी. आय. ए. शी संबंधीत होते. त्यांच्याजवळ वॉकीटॉकी, फोन-टॅपिंगचे साहित्य अशी गुप्तहेरीच्या कामासाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली. वृत्तपत्रांनी या घटनेकडे फारसे गंभीरपणे पाहीले नाही. अपवाद होते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे दोन वार्ताहर : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. यापैकी बॉबला कामावर रूजू होऊन उणेपुरे नऊ महीने झाले होते. कार्ल त्यामानाने अनुभवी होता. तपास घेताना ह्या प्रकरणात सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाने सी. आय. ए, एफ. बी. आय. आणि जस्टीस या सरकारी संघटनांचा वापर डेमोक्रॅटिक पक्षातील लोकांवर पाळत ठेवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची निवडणुकीत हरप्रकारे मुस्कटदाबी करणे अशासाठी केल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकरणाची परिणिती अखेर राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या राजीनाम्यात झाली. अमेरिकन राजकारणातील हा एक नीचतम बिंदू होता. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे अथक परिश्रम केले त्याची कहाणी आहे हा चित्रपट. ह्याचा आधार आहे त्यांनी लिहिलेले ह्याच नावाचे पुस्तक.

निर्मिती

या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ऍलन पाकुला. याशिवाय रेडफोर्ड पाकुलाबरोबर सहनिर्माताही होता. या चित्रपटाच्या कल्पनेपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेडफोर्डचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण आधी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयात करायचे ठरले होते. पण ते अशक्य आहे असे दिसल्यावर ह्या चमूने या वृत्तपत्राची आख्खी न्यूजरुम जशीच्या तशी स्टुडिओत उभी केली. अगदी कचरापेटीतील कचराही मूळ कार्यालयातून आणलेला होता. चित्रपटात कुठलीही राजकारणी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त फोनवरून त्यांचे आवाज ऐकू येतात. याशिवाय काही ठिकाणी निक्सन आणि इतरांच्या दूरचित्रवाणीवरील फिती वापरल्या आहेत. कार्ल आणि बॉब यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती त्या दोघांकडून घेतली गेली होती. यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी त्या दोघांबरोबर बराच काळ व्यतीत केला. प्रसंगांशी पूर्णपणे तन्मय होण्यासाठी रेडफोर्ड आणि हॉफ़मन यांनी स्वतःच्या संवादांबरोबर एकमेकांचेही संवाद पाठ केले होते.

वैशिष्ट्ये

ह्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हॉलिवूडमध्ये तयार होऊनही ह्यावर हॉलीवूडची छाप नाही. सर्व प्रसंग कृत्रिम नाट्यमयता न आणता नैसर्गिकरीत्या चित्रित केले आहेत. असे असूनही उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते. तुरळक अपवाद वगळता कुठल्याही प्रसंगात कॅमेरा फिरत नाही. एक-दोन प्रसंगात कॅमेरा या दोघांपासून झूम-आऊट होत लॉग शॉटमध्ये शहराच्या विशालकाय इमारतींवर स्थिरावतो, एका बाजूला विशाल सत्ता आणि दुसर्‍या बाजूला दोन माणसे यातील विरोधाभास सूचित करणारा. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे कमीत कमी पार्श्वसंगीत. नेहमी ऐकू येतो तो टंकलेखन यंत्रांचा खडखडाट. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या वेळी वापरलेले विवाल्दीचे संगीत अत्यंत परिणामकारक ठरते.

या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक होते गॉडफादर चित्रित करणारे गॉर्डन विलीस. त्यांची खासियत म्हणजे कमी प्रकाशातील चित्रीकरण. यासाठीच त्यांचे 'प्रिंस ऑफ डार्कनेस' हे टोपणनाव पडले. या चित्रपटात प्रामुख्याने दोन ठिकाणी घडणारे प्रसंग आहेत. एकतर न्यूजरूम मध्ये किंवा बाहेर. बाहेर घडणार्‍या गोष्टी पडद्याआड आहेत, त्यातले खरे किती, खोटे किती हे माहीत नाही. याउलट न्यूजरूममध्ये आहे कठोर सत्य. ह्याला अनुसरून विलीस यांनी बाहेरचे बहुतेक सर्व प्रसंग कमी प्रकाशात किंवा जवळजवळ अंधारात चित्रित केले आहेत. आणि न्यूजरूममध्ये आहे भावनाविरहीत, फ्लूरोसंट असा प्रखर प्रकाश. या दोन्हींचा विरोधाभास खूपच प्रभावी झाला आहे.

पुरस्कार

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन या चार विभागांमध्ये ऑस्कर पारितोषिक मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागांमध्ये ऑस्कर नामांकन मिळाले.

बाह्यदुवे