स्टिलवेल रोड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विशेष लेख |
|---|
| हा लेख मराठी विकिपिडीयावरील १५,०००वा लेख आहे. |
स्टिलवेल रोड हा भारत, म्यानमार व चीनला जोडणारा रस्ता आहे.
लेडो रोड या नावानेही ओळखला जाणारा हा रस्ता भारताच्या आसाम राज्यातील लेडो शहरापासून सुरू होतो व चीनच्या कुन्मिंग शहरापर्यंत जातो. दुसर्या महायुद्धात जपानच्या सैन्याने बर्मा रोड हा रस्ता इ.स. १९४२मध्ये काबीज केला व भारतमार्गे होणारा चीनचा रसदपुरवठा तोडला. त्यामुळे दोस्त राष्ट्रांनी हा पर्यायी मार्ग तयार केला.

