सुपर्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुपर्ण
Raubadler Aquila rapax.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: ॲक्सिपिट्रीफोर्मेस
कुळ: गृध्राद्य
(Accipitridae, एक्सिपिट्रीडी)

जातकुळी: ॲक़्विला
जीव: अ‍ॅ. रॅपॅक्स
शास्त्रीय नाव
ॲक़्विला रॅपॅक्स
(टेमिंक, १८२८)
इतर नावे

ॲक़्विला रॅपॅक्स रॅपॅक्स
'

सुपर्ण किव्हा पिंगट गरुड(शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[१] लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी तो घालतो.[२]

वर्णन[संपादन]

तो आकाराने घरीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते.त्याचा रंग गडद उडी ते मातट बदामी असतो.पाय पिसांनी झाकलेले असतात.

तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गीधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मिळ झाले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश. 
  2. बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण अँड मलबार - सतीश पांडे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.