सुन यात-सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव सुन असे आहे.
सुन यात-सेन

सुन यात-सेन (मराठी लेखनभेद: सुन यात-सन ; चिनी: 孫逸仙 ; फीनयिन: Sūn Yìxiān ; वेड-जाइल्स: Sun I-hsien ; कांतोनी: Sun Yat-sin ) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८६६; श्यांगषान, क्वांग्तोंग, चीन - १२ मार्च, इ.स. १९२५ ; पेइचिंग, चीन) हा चिनी क्रांतिकारक व चीनच्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष होता. चिनी साम्राज्यावरील छिंग घराण्याच्या अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली चीनचे प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर नवनिर्मित प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा याच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९१९ साली स्थापलेल्या कुओमिंतांग पक्षाचा हा सहसंस्थापक व पहिला पक्षनेता होता. साम्राज्योत्तर काळात चीनचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला सुन तायवान सामुद्रधुनीच्या दोन्ही किनार्‍यांवरील समाजांत महनीय मानला जाणारा इ.स.च्या २०व्या शतकातील एकमेव चिनी राजकारणी आहे. याला चीनच्या प्रजासत्ताकात "राष्ट्रपिता", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात "लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता" मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.