साळुंखे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
साळुंखे हे मराठी आडनाव आहे.
ऐतिहासिक संदर्भ [संपादन]
साळुंखे कुळ वर्णव्यवस्थेनुसार क्षत्रिय वर्णातील असून ते सूर्यवंशी आहे. इ.स.च्या ५ व्या शतकातील चालुक्य राजघराण्याचे वंशज महाराष्ट्रात उत्तरकाळात साळुंखे कुलनामाने ओळखले जाऊ लागले व तेच गुजरात मध्ये सोलंकी. वर्तमान कर्नाटकातील बदामी या गावी चालुक्यांचे मुख्य ठाणे होते. चालुक्य या कुलनामाची सालुक्या-साळुंखे-सोलंकी अशी अपभ्रष्ट रूपे रूढ होऊन ही आडनावे तयार झाली.सुलतानी व मराठी शाहीत त्यांचा सरदारी थाट होता.
जातिव्यवस्थात्मक संदर्भ [संपादन]
मराठा जातीतील ९६ कुळांपैकी साळुंखे हे एक कुळ आहे[ संदर्भ हवा ].
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |