सायमन कमिशन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे १९२७ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास सायमन कमिशन असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी लाहोरातील एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.