सम्राट चंग्-द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंग्-द
正德
अधिकारकाळ जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१
जन्म ऑक्टोबर २६, इ.स. १४९१
मृत्यू एप्रिल २०, इ.स. १५२१
राजघराणे मिंग

सम्राट चंग्-द (सोपी चिनी लिपी: 正德; पारंपरिक चिनी लिपी: 正德; फीनयीन: Zhèngdé ;) (ऑक्टोबर २६, इ.स. १४९१ - एप्रिल २०, इ.स. १५२१), जातनाम चू हौचाओ हा चिनावर राज्य करणारा मिंगवंशीय सम्राट होता. तो सम्राट हाँगचीचा थोरला पुत्र होता. त्याने जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१ या कालखंडात राज्य केले. चंग्-द याच्या कारकिर्दीत चिनाचे एखाद्या युरोपीय सत्तेशी पहिल्यांदा राजकीय सबंध प्रस्थापित झाले. इ.स. १५१३ सालात पोर्तुगालाचा राजा पहिला मानुएल याने फेर्नाव पीरेस दि आंद्रादेतोमे पीरेस यांना बैजिंग व लिस्बन दरबारांदरम्यान राजकीय सबंध प्रस्थापित करायला वकील म्हणून पाठवले.