सदस्य चर्चा:PrathamMarathi

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन[संपादन]

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

   स्वागत PrathamMarathi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन PrathamMarathi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,२०५ लेख आहे व १४१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार[संपादन]

नमस्कार प्रथमेश !

मराठी विकिपीडियावर उत्साही सहभाग घेऊन पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन ! :)
विकिपीडियाविषयीच्या वेगवेगळ्या पैलूंविषयीऊपलब्ध मार्गदर्शन सहाय्य:आशय येथे आहे त्या पानावरून तुम्हांला इतर पानांचे दुवे दिसतील; त्या त्या पानावर जाऊन नजर फिरवल्यास काही उपयुक्त सल्ले/सूचना तुमच्या नजरेस पडतील. विशेषकरून विकिपीडिया:शैली मार्गदर्शक येथील माहिती एकवार जरूर चाळा.

बाकी, तुम्ही इंग्लिश विकिपीडियावरून माहिती भाषांतरित करून मराठीवर आणू शकताच; पण केवळ तेवढ्यापुरतेच तुमचे प्रयत्न सीमित राहू देऊ नका. किंबहुना तुम्ही पुस्तकांमधून, इंग्लिश विकिपीडियावरून, मराठी विश्वकोशावरून, मराठी/इंग्लिश भाषेतील अन्य कोशग्रंथांवरून किंवा अन्य माहितीस्रोतांवरून एखाद्या विषयाची माहिती वाचा, मग ती तुमच्या शब्दांमध्ये मराठी विकिपीडियासाठी लिहायचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया व्यक्तिशः तुमच्यासाठीही रंजक आणि आनंददायी ठरेल आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्यातही चांगला हातभार लागेल.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या विषयांवर काम करू शकता किंवा विकिपीडिया:प्रकल्पविकिपीडिया:प्रकल्प/मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी येथील माहिती वाचून उपलब्ध विकिप्रकल्पांमध्ये सामील होऊन अन्य सदस्यांसोबत सहयोगी पद्धतीने (कोलॅबोरेटिव्ह पद्धतीने) काम करू शकता.

याखेरीज अजूण एक उपयुक्त दुवा सांगतो : शुद्धलेखनाचे नियम. येथे मराठी शुद्धलेखनाचे नियम विशद केले आहेत. दैनंदिन कामात या पानाचा पुष्कळ उपयोग होतो.

अजून काही मदत लागली, तर जरूर सांगा.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०८:२५, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

इस्रायल या लेखात आपण "भारत आणि इस्रायल" असा विभाग बनवल्याचे दिसले. खरे पाहता विकिपीडियावरील माहिती देशनिरपेक्ष पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. इस्रायल किंवा अन्य कोणत्याही देशाबद्दल लिहिताना त्या देशाच्या भारतासोबतच्या संबंधांना स्वतंत्र विभाग देण्याइतपत महत्त्व देणे "विश्वकोशीय" (म्हणजे जागतिक परिप्र्येक्षातून पाहणारे) ठरणार नाही.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:०५, १४ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

अनुस्वार[संपादन]

नमस्कार ! पाकिस्तान आणि अन्य लेखांमध्ये आपण लिहिलेल्या मजकुरात एक तांत्रिक त्रुटी आढळली - त्यात अनुस्वाराचे लेखन/फाँट काहीतरी विचित्र दिसत आहे. उदा., तुम्ही लिहिलेल्या शब्दाचे लेखन 'समस्या॓शी' असे दिसत आहे; ते खरेतर 'समस्यांशी' असे हवे. या संदर्भाने शोध घेऊन समस्या सोडवता येईल काय ?

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:३०, १६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

नमस्कार PrathamMarathi, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.